आवक घटल्याने कांद्याने खाल्ला भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:42+5:302021-02-05T05:06:42+5:30
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटल्याने भावात मोठी वाढ ...

आवक घटल्याने कांद्याने खाल्ला भाव
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटल्याने भावात मोठी वाढ झाली. तळेगाव बटाट्याची आवक कमी होऊनही बाजारभाव स्थिर राहिले. भुईमूग शेंगांची आवक वाढूनही भावात मोठी वाढ झाली,लसूणाची आवक वाढूनही भाव स्थिर राहिले.गाजर व वाटण्याची प्रचंड आवक झाल्याने भाव घसरले.
कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, भेंडी, कारली, काकडी, दुधी भोपळा दोडक्याच्या आवक घटूनही बाजारभावात घसरण झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू भाजीची आवक घटल्याने भावात घसरण झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गायच्या संख्येत वाढ झाली. तर बैल व म्हैशीच्या संख्येत वाढ झाली व शेळ्यांमेंढयांच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल ४ कोटी रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ४ हजार २५० क्विंटल झाली. घटल्याने कांद्याचे भावात ३०० रुपयांची मोठी वाढ झाली. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ८०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही बटाट्याच्या भावात ४०० रुपयांची कमी झाली. बटाट्याचा कमाल भाव १हजार ४०० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक २० क्विंटल झाली.मागील आठवड्याच्या तुनलेत ३ क्विंटलने वाढ होऊनही बाजारभावात १,००० रुपयांवर स्थिरावले. भुईमुग शेंगांची २० क्विंटल आवक झाल्याने भाव ८ हजार ५०० पोहचले.
चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक १९० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३,००० ते ४,००० रुपये असा भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे –
कांदा - एकूण आवक - ४,२५० क्विंटल. भाव क्रमांक १. ३,३०० रुपये, भाव क्रमांक २. २,६०० रुपये, भाव क्रमांक ३. २,००० रुपये.
बटाटा - एकूण आवक - ८०० क्विंटल. भाव क्रमांक १. १,४०० रुपये, भाव क्रमांक २. १,००० रुपये, भाव क्रमांक ३. ८०० रुपये.
फळभाज्या
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे -
टोमॅटो - ७० पेट्या ( ३०० ते ६०० रू. ), कोबी - १०५ पोती ( २०० ते ४०० रु. ), फ्लॉवर - ११० पोती ( २०० ते ५०० रु.),वांगी - ३५ पोती (२,५०० ते ३,००० रु.). भेंडी - ३० पोती ( २,००० ते ३,००० रु.),दोडका - २५ पोती (१,५०० ते २,५०० रु.). कारली - ३५ डाग ( २,००० ते ३,००० रु.). दुधीभोपळा - १८ पोती ( ६०० ते १,२०० रु.),काकडी - २५ पोती (१,००० ते २,००० रु.). फरशी १० - पोती ( १,००० ते २,००० रु.). वालवड - २० पोती ( २,००० ते ४,००० रु.). गवार - १५ पोती ( २,५०० ते ४,५०० रू.), ढोबळी मिरची - ३० डाग (१,००० ते २,००० रु.). चवळी - १० पोती (१,००० ते २,००० रुपये ), वाटाणा - ६०० पोती (१,००० ते १,००० रुपये ), शेवगा - ८ पोती (३,५०० ते ५,००० रुपये), गाजर - १४० पोती (१,००० ते १,५०० रु.).
पालेभाज्या
राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची ६० हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला २०२ ते १,२०० रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची ४० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना ५०० ते १,६०० रुपये एवढा भाव मिळाला. शेपू व पालकची काहीही आवक झाली नाही.
चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रतिशेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे -
मेथी - एकूण २७ हजार ५३० जुड्या ( ३०० ते ७०० रुपये ), कोथिंबीर - एकूण २२ हजार ६४५ जुड्या ( ४०० ते ८०० रुपये ), शेपू - एकुण ७ हजार ५३० जुड्या ( ४०० ते ६०० रुपये ), पालक - एकूण ४ हजार १५० जुड्या ( ३०० ते ५०० रुपये ).
जनावरे
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसा ठी आलेल्या ९० जर्शी गायींपैकी ४८ गाईची विक्री झाली. (१०,००० ते ४,०००० रुपये ), १६५ बैलांपैकी ११० बैलांची विक्री झाली.(१०,००० ते ३,०००० रुपये), १७० म्हशींपैकी १४५ म्हशींची विक्री झाली. (१०,००० ते ६,०००० रुपये), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ८,४८० शेळ्या - मेंढ्यापैकी ७,७६० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १,५०० ते १२,००० रुपये इतका भाव मिळाला.
३१चाकण
चाकण बाजारात पालेभाज्यांची मोठी आवक झाली.