शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा पन्नाशीत

By admin | Updated: August 19, 2015 00:10 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात आज कांद्याच्या बाजारभावाने पुन्हा एकदा उसळी घेत प्रती किलो पन्नाशी पार केली

आळेफाटा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात आज कांद्याच्या बाजारभावाने पुन्हा एकदा उसळी घेत प्रती किलो पन्नाशी पार केली. प्रतवारीप्रमाणे प्रती दहा किलो ४०० ते ५२५ रुपये असा बाजारभाव मिळाल्याची माहिती कार्यालय प्रमुख स्वप्नील काळे यांनी दिली. कांद्याच्या कमी झालेल्या आवकेचा परिणाम झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव वाढत आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यात कांद्याच्या चांगल्या आवकेसाठी प्रसिद्ध असलेल्या या उपबाजारात कांद्याचे भाव हे प्रती किलो वाढल्याचे दिसून येत आहे. अवकाळी पावसामुळे कांद्याची प्रत खालावल्याने एप्रिल व मे महिन्यात काढणी झालेला कांदा सडणार, या अपेक्षेने शेतकरीवर्गाने कांदा विक्रीसाठी प्राधान्य दिले. चांगल्या प्रतीचा कांदा कमी प्रमाणात असल्याने सध्या हा कांदा चांगल्या प्रकारे विक्री होत आहे. रविवारी झालेल्या आठवडे बाजार चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रती दहा किलो ५१० रुपये बाजारभाव मिळाला होता. (वार्ताहर)