कांदा पन्नाशीत
By Admin | Updated: August 19, 2015 00:10 IST2015-08-19T00:10:58+5:302015-08-19T00:10:58+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात आज कांद्याच्या बाजारभावाने पुन्हा एकदा उसळी घेत प्रती किलो पन्नाशी पार केली

कांदा पन्नाशीत
आळेफाटा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात आज कांद्याच्या बाजारभावाने पुन्हा एकदा उसळी घेत प्रती किलो पन्नाशी पार केली. प्रतवारीप्रमाणे प्रती दहा किलो ४०० ते ५२५ रुपये असा बाजारभाव मिळाल्याची माहिती कार्यालय प्रमुख स्वप्नील काळे यांनी दिली. कांद्याच्या कमी झालेल्या आवकेचा परिणाम झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव वाढत आहेत.
उत्तर पुणे जिल्ह्यात कांद्याच्या चांगल्या आवकेसाठी प्रसिद्ध असलेल्या या उपबाजारात कांद्याचे भाव हे प्रती किलो वाढल्याचे दिसून येत आहे. अवकाळी पावसामुळे कांद्याची प्रत खालावल्याने एप्रिल व मे महिन्यात काढणी झालेला कांदा सडणार, या अपेक्षेने शेतकरीवर्गाने कांदा विक्रीसाठी प्राधान्य दिले.
चांगल्या प्रतीचा कांदा कमी प्रमाणात असल्याने सध्या हा कांदा चांगल्या प्रकारे विक्री होत आहे. रविवारी झालेल्या आठवडे बाजार चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रती दहा किलो ५१० रुपये बाजारभाव
मिळाला होता. (वार्ताहर)