पुणे : गेल्या दीड वर्षांपासून शहरात होर्डिंग परवानगी देण्याचे काम बंद होते. परंतु, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या चर्चेनुसार १ आॅगस्टपासून पुन्हा परवानगी देण्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे शहरात किमान १ हजारपेक्षा अधिक होर्डींगला नव्याने परवानगी देण्यात येणार असून, यातून महापालिकेला तब्बल २० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.महापालिकेने २०१३ मध्ये होर्डिंग्जसाठी २२२ रुपये प्रती चौरस फूट दराने जाहिरात शुल्क आकारण्याचा घेतला होता. परंतु, हा निर्णय वादात अडकला व महापालिकेच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. यामध्ये न्यायालयाने दर वाढी संदर्भांत महापालिकेच्या मुख्य सभेत निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य सभेत २२२ रुपये चौरसफुटाप्रमाणेच आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे गेल्या दीड वर्षांपासून शहरात नव्याने होर्डिगला परवानगी देणे व नूतनीकरणाचे काम बंद होते. आता १ आॅगस्टपासून पुन्हा नवीन होर्डिंगला परवानगी देण्याचे काम सुरु झाले आहे. सध्या शहरामध्ये सुमारे १ हजार ७४९ होर्डिंग असून नव्याने किमान १ हजार १०० होर्डिंगला परवानगी देण्यात येईल. यामुळे महापालिकेच्या महसूलामध्ये २० कोटी रुपयांची भर पडले..................अनधिकृत होर्डिंगला आळा बसेल शहरात गेल्या दीड वर्षांपासून नवीन होर्डिंगच्या परवानग्या बंद होत्या. मुख्यसभेत झालेल्या चर्चेनंतर पुन्हा होर्डिंगला परावनगी देण्याचे काम सुरु झाले आहे. होर्डिंगला परवानगी देण्याचे काम बंद असल्याने शहरात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे होर्डिंग लावण्यात आले. शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंगवर कडक कारवाई करण्यात येणार असून आता नव्याने परवानगी देण्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे अनधिकृत होर्डिंगला देखील आळा बसेल - तुषार दौंडकर, आकाशचिन्ह विभाग प्रमुख
शहरात नव्याने उभे राहणार एक हजार होर्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 14:35 IST
महापालिकेने २०१३ मध्ये होर्डिंग्जसाठी २२२ रुपये प्रती चौरस फूट दराने जाहिरात शुल्क आकारण्याचा घेतला होता. परंतु, हा निर्णय वादात अडकला व महापालिकेच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले.
शहरात नव्याने उभे राहणार एक हजार होर्डिंग
ठळक मुद्दे२२२ रुपये प्रती चौरस फूट दर : महापालिकेला मिळणार २० कोटींचा महसूल आता १ आॅगस्टपासून पुन्हा नवीन होर्डिंगला परवानगी देण्याचे काम सुरुसध्या शहरामध्ये सुमारे १ हजार ७४९ होर्डिंग असून नव्याने किमान १ हजार १०० होर्डिंगला परवानगी