शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीने धडक दिल्याने एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 20:34 IST

डिलीव्हरी बॉयच्या भरधाव दुचाकीच्या धडकेने एक जण गंभीर जखमी झाला. तसेच त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले. हिंजवडी आयटीपार्क फेज – 1 येथे बुधवारी (दि. 18) साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.  

पिंपरी : डिलीव्हरी बॉयच्या भरधाव दुचाकीच्या धडकेने एक जण गंभीर जखमी झाला. तसेच त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले. हिंजवडी आयटीपार्क फेज – 1 येथे बुधवारी (दि. 18) साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सचिन राजू ऊर्फ राजाराम साळुंखे (वय 27, रा. माणगाव, साळुंखेवस्ती, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास राजू डामसे (वय 29, रा. माणगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डिलीव्हरी बॉयचे नाव आहे. तर राजू ऊर्फ राजाराम काळुराम साळुंखे असे अपघातात जखमी झालेल्याचे नाव आहे.

आरोपी विकास डामसे याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांचे वडील राजू ऊर्फ राजाराम साळुंखे यांना धडक दिली. यात दुचाकीचे नुकसान होऊन साळुंखे गंभीर जखमी झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

रिक्षाच्या धडकेने सायकलस्वार जखमी  : भरधाव रिक्षाने धडक दिल्याने जेष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला. यात सायकलचेही नुकसान झाले. रिक्षाचालक अपघातस्थळी न थांबता पळून गेला. निगडी येथे शनिवारी (दि. 21) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास हा अपघात झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सोमनाथ गुजाबा गायकवाड (वय 35, रा. रुपीनगर, तळवडे, मूळगाव जाकनगाव, ता. खटाव, जि. सातारा) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुजाबा कोंडीबा गायकवाड (वय 60) असे या अपघातात जखमी झालेल्या जेष्ठ नारिकाचे नाव आहे. फिर्यादी सोमनाथ यांचे वडील गुजाबा हे सायकलवरून घरी जात होते. त्यावेळी भरधाव रिक्षाने त्यांच्या सायकलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात गुजाबा गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रिक्षाचालक अपघातस्थळी न थांबता निघून गेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी