शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Organ Donation: एका व्यक्तीच्या अवयवदानाने मिळते चाळीस जणांना जीवदान...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 15:48 IST

आयुष्यातल सर्वात श्रेष्ठ कर्म म्हणजे "अवयवदान"

- आरुषी अनारे

रसिकहो, तुम्ही हे ऐकलेच असेल "मरावे परी किरतीरूपी उरावे". याचाच अर्थ कि,  आपण किती आयुष्य जगलो हे महत्त्वाचे नाही, पण आपण जितके आयुष्य जगलो. त्यामध्ये असेकाही चांगले कार्य केले पाहिजे की लोक आपल्याला आपल्या मृत्यू नंतर पण स्मरण करतील आणि आपली प्रशंसा करतील. जगातील कुठलीही व्यक्ती पैशाने किंवा ऐश्वर्याने श्रेष्ठ होत नसून तो आपल्या कर्तृत्वाने आणि कर्माने श्रेष्ठ होत असतो, आणि आयुष्यातल सर्वात श्रेष्ठ कर्म म्हणजे "अवयवदान".

खुप लोकांना असे वाटत असेल की,  अवयवदान हे मृत्युनंतरच केले जाते. पण अवयवदान हे जिवंत असताना ही केले जाऊ शकते. कायद्यानुसार जीवंत व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्तीला अवयवदान करू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती अवयवदान करते. तेव्हा त्या दाता व्यक्तीच्या जीवाला धोका नसतो.  पण तरीही त्या व्यक्तीतील एक अवयव कमी होतो आणि हे त्या व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते. यासाठी जिवंत व्यक्तीने अवयवदान करण्याची संख्या कमी करणे गरजेचे आहे़. यासाठी मृत व्यक्तींच्या अवयवदानाचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे.

लक्षात ठेवा एक मृतदेह सात लोकांचा जीव वाचवू शकतो. त्यांना जगण्याची नवीन आशा देऊ शकतो आणि पस्तीस लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करू शकतो, याचाच अर्थ एकामृतदेहामुळे सुमारे बेचाळीस लोकांना आपले आयुष्य सामान्य माणसासारखे जगता येईल.

तुम्हालापण असे प्रश्न पडले असतील आणि बरेच गैरसमजसुद्धा असतील जसे कोण कोण अवयवदान करू शकत. मृत्यू नंतर किती वेळात अवयवदान करावे?  इत्यादी... तर अनैसर्गिक मृत्यू जसे आत्महत्या, अपघात, अपराध, जळून किंवा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास तसेच एड्स किंवा पसरणाऱ्या आजाराने मृत्यू झालेल्या माणसांचे मृतदेह स्विकारले जात नाही.

प्रत्येक अवयवाचे दान मृत्यूनंतर काही ठराविक वेळातच करता येऊ शकते. जसे चार तासापर्यंत हृदय जतन करता येते, सहा तासापर्यंत फुफ्फुसे जतन करता येतात. किडनी अठ्ठेचाळीस तासापर्यंत देता येते आणि डोळ्यांचे जतन मृत्यू झाल्यानंतर काही महिन्यांपर्यंत करता येते. परंतु अठरा वर्षावरील कोणतीही व्यक्ती स्वईच्छेने अवयवदान करू शकते, तर अठरा वर्षाखालील मुलांना अवयवदान करण्यासाठी आपल्या पालकांची परवानगी लागते. म्हणूनच अवयवदान करणे महत्त्वाचे आहे कारण "अवयवदान'' हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. (या लेखाचे लेखक अवयवदान अभ्यासक आहेत.) 

टॅग्स :Puneपुणेdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटलSocialसामाजिक