शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

CoronaVirus: युरोपीय देशात १५ दिवसांत एक लाख २७ हजार मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 4:01 AM

भारतीय उपखंडातील देशात बऱ्याच अंशी नियंत्रण साधले आहे. जगभरात १० एप्रिलला एक लाख रुग्णांचा

विकास चाटी पुणे : जगभरात कोरोना विषाणूचा कहर वाढत चालला आहे; मात्र प्रगत देशांमध्येच कोरोनाने थैमान घातले असून, मृत व बाधितांच्या संख्येत त्यांचा वाटा खूप मोठा आहे. तुलनेने भारतीय उपखंडातील देशात बऱ्याच अंशी नियंत्रण साधले आहे. जगभरात १० एप्रिलला एक लाख रुग्णांचा(१००४४०) कोरोनाने मृत्यू झाला; मात्र त्यानंतर केवळ १५ दिवसांत त्यात आणखी एक लाख २५ हजार ६०८ मृतांची वाढ झाली. अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, इंग्लंड आदी देशांमध्ये मृतांची संख्या अधिक आहे. एकट्या अमेरिकेत २७ एप्रिलपर्यंत कोरोना मृतांची संख्या ५६,१८९ पर्यंत गेली आहे. इटली, स्पेन, जर्मनी व इंग्लंडमध्येही २० हजारांपेक्षाही जास्त मृत झाले.अमेरिकेत १० एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान ३२,९७२, स्पेन ६,५५४, इटली ७,१२०, फ्रान्स ९,०४८, जर्मनी ३,०४६, इंग्लंड १०,५४३ व इराण १,३४२ इतकी मृतांच्या संख्येत वाढ झाली. याच कालावधित बाधितांच्या संख्येत अमेरिकेत ४,१४,४९५, स्पेन ६२,७११, इटली ४५,४१७, फ्रान्स ३४,९५९, जर्मनी ३४,५३५, इंग्लंड ६९,७०६ व इराण २०,००२ वाढ झाली.जगभरात या पंधरा दिवसांत बाधितांच्या संख्येत ११,२४,३५१ इतकी वाढ झाली. त्यापैकी वरील ७ देशांतील एकूण बाधितांची संख्या ६,८१,८२५ इतकी म्हणजे, ६१ टक्के इतकी आहे. पंधरा दिवसांतील जगभरातील एकूण मृतांच्या संख्येपैकी वरील ७ देशांतील मृतांची संख्या ७०,६२५ म्हणजे ७० टक्के एवढी आहे.>बºया होणाºया रुग्णांची संख्या दिलासादायकपंधरा दिवसांत अमेरिकेत ६४,०७४, स्पेन ३६,६८७, इटली ३०,०४३, फ्रान्स १८,५६१ व जर्मनी ५४,३९३ रुग्ण बरे झाले. जगभरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४,०५,५४८ आहे. अमेरिकेत सरासरी दररोज ४,२७१ रुग्ण बरे, तर २,१९८ रुग्ण मृत झाले. स्पेनमध्ये बºया होणाºया रुग्णांची रोजची सरासरी २,४४५ असून, दररोज ४३६ रुग्ण मृत झाले आहे. इटली रोज सरासरी २ हजार रुग्ण बरे झाले असून, ४७४ रुग्ण मृत पावले आहेत. फ्रान्स सरासरी रोज १,२३७ रुग्ण बरे तर सरासरी रोज ६०३ रुग्ण मृत झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या