स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू

By Admin | Updated: April 1, 2015 04:55 IST2015-04-01T04:55:35+5:302015-04-01T04:55:35+5:30

राजगुरुनगरमधील संशयित स्वाइन फ्लू रुग्णाचा चिंचवड येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यामुळे खेड तालुक्यातील स्वाइन फ्लूमुळे मृत्यू

One killed by swine flu | स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू

स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू

राजगुरुनगर : राजगुरुनगरमधील संशयित स्वाइन फ्लू रुग्णाचा चिंचवड येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यामुळे खेड तालुक्यातील स्वाइन फ्लूमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या पाचवर गेली आहे. शासनाच्या आरोग्य विभागाकडे याबाबत अद्याप नोंद नसल्याचे तालुका आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले.
खेड तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात दोन रुग्ण स्वाइन फ्लूने दगावले होते. या महिन्यात २२ तारखेला बिरदवडी येथील आणि २५ तारखेला सोळू येथील रुग्ण स्वाइन फ्लूने दगावल्याचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. एस. आर. गोरे यांनी सांगितले. राजगुरुनगर येथील एक मध्यमवयीन शेतकरी रुग्ण आज पहाटे दगावला. त्याचा अंत्यविधी आज येथे झाला. आधी राजगुरुनगर येथे आणि नंतर चिंचवड येथील खासगी रुग्णालयात तो दाखल होता. तेथील डॉक्टरांनी चाचणीत स्वाइन फ्लू सापडल्याचे सांगितले. मात्र नोंद झालेली नाही. (वार्ताहर)

Web Title: One killed by swine flu