तळेगाव न्हावरा येथे एकाचा दगडाने ठेचून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:09 IST2021-06-06T04:09:06+5:302021-06-06T04:09:06+5:30
हरीश सुधाकर काळे (वय ३०, रा. शासकीय गोदामाजवळ, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबबात पोलिसांनी ...

तळेगाव न्हावरा येथे एकाचा दगडाने ठेचून खून
हरीश सुधाकर काळे (वय ३०, रा. शासकीय गोदामाजवळ, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील तळेगाव-न्हावरा रस्त्याच्या कडेला दोघा इसमांमध्ये कोणत्यातरी कारणातून वाद सुरू असताना हरीश काळे या इसमाने एका अज्ञात इसमावर दगडाने हल्ला करत भला मोठा दगड समोरील इसमाच्या डोक्यात घालून त्याला गंभीर जखमी करत जागेवरच ठार केले. घटना समजताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केले व शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. शिक्रापूर पोलिसांनी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत मयत व्यक्तीचे नाव समजू शकले नव्हते. दरम्यान, तळेगाव ढमढेरेचे पोलीस पाटील पांडुरंग नरके यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, संशयावरून हरीश सुधाकर काळे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.