One killed in accident in Khopoli Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ भीषण अपघातात एक जण ठार 

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ भीषण अपघातात एक जण ठार 

 लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली हद्दीमध्ये किमी 39 जवळ आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कंटेनर व इनोव्हा कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. या अपघातात इनोव्हा कारचा चक्काचूर झाला आहे.

मारुती बलभिम कोराडकर ( वय 60, रा. बार्शी सोलापूर) हे अपघातात मयत झाले असून, संतोष अंकुश सावंत (वय 35, बत्तीस शिराळा, सांगली) हे जखमी झाले आहेत. पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली आर्यन टूर्स अँड ट्रँव्हलर्स कंपनीची इनोव्हा गाडी (एमएच 03 सीपी 4747) ही समोर जाणारा कंटेनर क्र. (एमएच 43 बीजी 0381) याला मागून जोरात धडकल्याने हा भीषण अपघात झाला. यामध्ये एक जण ठार व एक जण जखमी झाला तर अपघातामध्ये इनोव्हा गाडीचा चक्काचूर झाला.

Web Title: One killed in accident in Khopoli Mumbai-Pune Expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.