शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

लोणी काळभोरमध्ये मोबाईल चोरी केल्याच्या कारणावरुन एकाचे अपहरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 19:05 IST

अपहरण केलेल्या व्यक्तीने चोरीच्या मोबाईलची विक्री केल्याचे समजताच चौघां आरोपींनी दोन भावांना शिवीगाळ करत त्यांना हाताने मारहाण केली .

लोणी काळभोर : मोबाईल चोरी केल्याच्या कारणावरून चार जणांनी एकाचे अपहरण केले असल्याची घटना लोणी काळभोरमध्ये घडली. या घटनेत राजाभाऊ गोरोबा भुंबे ( रा. दामुनगर, कांदिवली, मुंबई ) याचे अपहरण करण्यात आले आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ संंजय गोरोबा भुंबे ( वय ४३, सध्या रा. भिमनगर, लोणी काळभोर. मुळ रा. डिजोळ आंबा, ता. अंबेजोगाई, जि. बीड ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विराज, अनिकेत, पवन व हनु (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही ) या चौघांविरोधांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी १६ मे रोजी रात्री १० ३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. अपहरण केलेल्या व्यक्तीने चोरीच्या मोबाईलची विक्री केल्याचे समजताच चौघां आरोपींनी दोन भावांना शिवीगाळ करत त्यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर रात्री १० - ३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी राजाभाऊ याला वैदूवाडी येथे घेऊन जातो असे म्हणत त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून घेऊन गेले. परंतू १८ मेपर्यंत तो  घरी न परतल्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जाऊन भावाचे अपहरण झाले असल्याची तक्रार दिली.  

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरMobileमोबाइलtheftचोरीPoliceपोलिसKidnappingअपहरणCrimeगुन्हा