शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

लॉकडाऊनमध्ये ऑनलाईनद्वारे शंभर कोटींचे व्यवहार; औषधांसह अन्नधान्य खरेदीवर जोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 06:58 IST

कोरोनाचा (कोविड १९) प्रसार रोखण्यासाठी देशात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्व व्यवसाय, उद्योग, बांधकाम क्षेत्र, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली.

- विशाल शिर्केपुणे : लॉकडाऊनमुळे देशातील सर्व बाजारपेठा ठप्प आहेत. बाजारातील चलनवलन थांबले आहे. मात्र अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या होत्या. या कालावधीत देशभरातील नागरिकांनी आॅनलाईन माध्यमातून जोरदार खरेदी केली आहे. तब्बल ९९ कोटी ९० लाख आॅनलाईन व्यवहारांची नोंद एकट्या एप्रिल २०२० मध्ये करण्यात आली आहे. या माध्यमातून दीड लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती नॅशनल पेमेंट कॉपोर्रेशन आॅफ इंडियाने (एनपीसीआय) दिली.कोरोनाचा (कोविड १९) प्रसार रोखण्यासाठी देशात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्व व्यवसाय, उद्योग, बांधकाम क्षेत्र, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. तब्बल दोन महिन्यांनी कोरोना प्रसाराचा अतिसंवेदनशील भाग वगळून काही अटींवर बाजार सुरू करण्यास केंद्र आणि राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र अजूनही प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील बाजारपेठा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत.लॉकडाऊन काळामध्ये अन्नधान्य, भाजीपाला औषध, दूध अशा पदार्थांच्या विक्रीला परवानगी होती. या काळामध्ये बाहेर पडणे शक्य नसल्याने नागरिकांनी इतर वेळी रोखीने केले जाणारे व्यवहारदेखीलआॅनलाईन अ‍ॅप अथवा आॅनलाईन बँकिंगद्वारे केले.गेल्या तीन ते चार वर्षांपासून आॅनलाईन व्यवहारामध्ये वाढ झाली आहे. मात्र लॉकडाऊन काळात इतर व्यवहार बंद असतानाही एप्रिल २0१९च्या तुलनेत व्यवहारांच्या संख्येत तब्बल २१ कोटी ७0 लाखांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर उलाढालही ९ हजार ८0६ कोटी रुपयांहून अधिक वाढली आहे.या बाबत माहिती देताना नॅशनल पेमेंट कॉपोर्रेशन आॅफ इंडियाच्या मुख्य कार्यकरी अधिकारी प्रावीणा राय म्हणाल्या, लॉकडाऊन काळामध्ये केबल, फोन, वीज आणि औषध बिल आॅनलाईन भरण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर सुपर मार्केट मध्ये अन्नधान्य खरेदीसाठी आॅनलाईन व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी या माध्यमाचा वापर वाढला आहे.या आॅनलाईन व्यवहारांत झाली वाढमोबाईल रिचार्ज, टेलिफोन आणि वीजबिलऔषध आणि अन्नधान्य खरेदीवर्ष व्यवहार संख्या उलाढाल कोटी रु.(कोटीमध्ये) (कोटी रुपये)फेब्रु-२० १३.२५ २,२२,५१६.९५मार्च-२० १२.४६ २,०६,४६२.३१एप्रिल-२० ९९.९० १,५१,१४०.६६फेब्रु.-१९ ६७.४० १,०६,७३७.१२मार्च-१९ ७९.९० १,३३,४६०.७२एप्रिल-१९ ७८.१० १,४२,०३४.३९

टॅग्स :onlineऑनलाइनbusinessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस