खराबवाडीत घरगुती गॅस सिलिंडर टाकीच्या स्फोटात एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 09:49 IST2019-06-27T09:47:17+5:302019-06-27T09:49:32+5:30

गॅस गळती झाल्यानं घडली दुर्घटना

one died in cylinder blast in khed | खराबवाडीत घरगुती गॅस सिलिंडर टाकीच्या स्फोटात एकाचा मृत्यू

खराबवाडीत घरगुती गॅस सिलिंडर टाकीच्या स्फोटात एकाचा मृत्यू

चाकण : खेडमधील खराबवाडीमध्ये पहाटे पाचच्या सुमारास घरातील सिलिंडरच्या टाकीमधून गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चाकण-तळेगाव रस्त्यावरील खराबवाडी येथे गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. घरात गॅस गळती झाल्यानंतर शेजारी असणारा किराणा दुकानदार भाजीपाला आणण्यासाठी उठवायला गेला. त्यावेळी लायटरने सिगारेट पेटवताच मोठा स्फोट झाला. स्फोट होताच दाराबाहेर उठवायला आलेला माणूस जोराने भिंतीवर फेकला जाऊन जागीच मृत्यूमुखी पावला. मांगीलाल चौधरी (वय ३५, रा. रघुनाथ खराबी चाळ, खराबवाडी, चाकण, ता.खेड, जि. पुणे) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या दुर्घटनेत पाणीपुरी व्यावसायिक ओमप्रकाश लोहार (वय २५, रा. रघुनाथ खराबी चाळ, खराबवाडी, चाकण, ता.खेड, जि. पुणे ) जखमी झाले. चाकण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या स्फोटाने आजूबाजूच्या घरांच्या खिडक्या निखळल्या. घरातील सामान अस्ताव्यस्त होऊन किचनमधील लादी लोहार यांच्या अंगावर पडली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 

Web Title: one died in cylinder blast in khed