जुन्नर (येडगाव) : येडगाव ( ता. जुन्नर) येथील भोरवाडी परिसरातील महेश दशरथ भोर(वय २९) ह्या युवकाचा मंगळवारी(दि.१६) पहाटे ४ वाजता वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी(दि.१६) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. पाळीव प्राण्यांमुळे महेश रोज शेतातील गोठ्यात रात्री झोपायला जात होते.परंतु, मंगळावारी पहाटे ४ च्या दरम्यान विजांच्या प्रचंड कडकडाट पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे महेशला जाग आली,त्यामुळे तो ५०० मीटर अंतरावर असलेल्या चुलत्यांच्या घरी जाऊ लागला पण दुर्दैवाने पुन्हा एकदा विजेचा जोरात कडकडाट होऊन वीज त्याच्या अंगावर पडली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी कुंदन भोर हे दुध काढण्यासाठी गोठ्यात चालले असता शेतातील पाऊलवाटेच्या कडेला महेश चा मृतदेह त्यांना दिसला.
जुन्नर तालुक्यातील येडगाव येथे वीज पडून एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 13:06 IST