पुण्यात पेटत्या बसचा थरार : अपघातानंतर पीएमपीएमएलची बस जळून खाक, तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 12:02 IST2021-02-22T11:28:11+5:302021-02-22T12:02:43+5:30
PMPML bus catches fire in Kharadi : खराडी परिसरात पेटली पीएमपीएमएलची बस अपघाताने बसला लागली आग दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुण्यात पेटत्या बसचा थरार : अपघातानंतर पीएमपीएमएलची बस जळून खाक, तरुणाचा मृत्यू
पुण्यातल्या खराडी भागामध्ये अपघात झाल्यामुळे पेटलेली पीएमपीची एक बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. नगर रस्त्यावरच्या खराडी बायपास जवळ ही घटना घडली आहे. यामध्ये बस खाली आलेल्या दुचाकी चालक तरुण यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे.
नगर रस्त्यावरील खराडी दर्गा येथील बालाजी हॉस्पिटल समोर आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास पी एम पी एम एल बस आणि दुचाकीची धडक झाली. या धडकेमुळे झालेल्या घर्षणातून पी एम पी एम एल बसने पेट घेतला. सीएनजी वर चालणारी बसल्यामुळे बस जळून खाक झाली. बसमधील प्रवासी वेळ उतरल्याने त्यांच्यापैकी कुणीही जखमी झाले नाही. मात्र बस खाली अडकल्याने दुचाकीस्वाराचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
अजिंक्य येवले असे या तरुणाचे नाव असून तर 26 वर्षांचा होता अशी माहिती दिली आहे. दरम्यान बस पेटल्याने स्थानिकांनी त्याचबरोबर वाहन चालवणाऱ्या नागरिकांनी गर्दी केली या सगळ्यात प्रकरणामुळे काही वेळ व परिसरात काही काळ वाहतूक कोंडी देखील झालेली होती