शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या शेतकरी आत्महत्येला झाली ३२ वर्षे ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकदिवसीय अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 15:50 IST

देशातील पहिल्या शेतकरी अात्महत्येला 32 वर्षे पुर्ण झाली. त्यानिमित्ताने अात्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी तसेच अात्महत्या करु नका, व्यवस्थेविरुद्ध लढा हा संदेश देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अन्नत्याग अांदाेलन करण्यात अाले.

ठळक मुद्देदेशातल्या पहिल्या शेतकरी अात्महत्येला झाली 32 वर्षेकर्जमुक्ती अाणि दीडपट हमीभावाची अांदाेलनकर्त्यांची मागणी

पुणे : यवतमाळ येथील चिलगव्हाण या गावातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह १९८६ रोजी सरकारच्या चुकीच्या धोरणांना कंटाळून आत्महत्या केली होती. ही देशातील नोंद झालेली पहिली शेतकरी आत्महत्या होती. या घटनेला ३२ वर्ष झाल्याच्या निमित्ताने त्या कुटुंबाला अभिवादन करण्यासाठी तसेच सध्याच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, पिकाला दीडपट हमीभाव द्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.     शहरातील झाशीची राणी चौक या ठिकाणी हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्याच्या कानाकाेपऱ्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या असंख्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.     यावेळी बोलताना तुपकर म्हणाले, साहेबराव करपे व देशातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी तसेच इतर शेतकऱ्यांना हिम्मत देण्यासाठी, आत्महत्या करु नका हे सांगण्यासाठी आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही हे एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करत आहोत.  सरकारने स्वामिनाथन आयोगातील दीडपट हमीभावाची शिफारस लागू करावी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी अशी मामची मागणी आहे. 

टॅग्स :PuneपुणेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाStudentविद्यार्थी