शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचे अपहरण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल; प्रेमसंबंधातून बरेवाईट केल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 21:19 IST

आरोपी सापडला पण तरुणीचा संपर्क नाही...

पुणे : पूर्वीच्या प्रेमसंबंधातून गोड बोलून तिचे बरेवाईट करण्याच्या हेतूने तरुणीचे अपहरण करणार्‍यावर चंदननगरपोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सागर गुंडव (रा. चांदुरबाजार, अमरावती) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी प्रतिक बापूराव गेडाम (वय २४, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या ३० वर्षाच्या बहिणीचे १० वर्षापूर्वी आरोपीबरोबर प्रेमसंबंध होते. आरोपी वाईट चालीचा असल्याचे समजल्यावर तिने त्याच्याशी संबंध तोडले. त्यामुळे गुंडव याने अमरावती येथील त्यांच्या घरी जाऊन तोडफोड व नासधुस केली होती. त्यानंतर फिर्यादीची बहिणी पुण्यात वडगाव शेरी येथील जय अपार्टमेंटमध्ये रहायला आली होती. सागर याने तिच्याशी गोड बोलून तिला १३ मार्च रोजी घेऊन गेला. त्यानंतर ती कोठेच मिळून आली नाही. चंदननगरपोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. अमरवती पोलिसांनी केलेल्या तपासात चांदूरबाजार येथे या तरुणीचा डबा व कपडे सापडले. मात्र, तिचा काहीही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तिच्या भावाच्या फिर्यादीनंतर चंदननगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे़.

याबाबत चंदननगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक थोपटे यांनी सांगितले की, आरोपी सापडला असला तरी ही तरुणी न मिळाल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तिच्या आईवडिलांनी तक्रार दिल्याने चांदूरबाजार पोलिसांनी सागर गुंडवे याला अटक केली. त्याला येत्या २ दिवसात ताब्यात घेऊन अधिक तपास करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेChandan NagarचंदननगरPoliceपोलिसKidnappingअपहरणArrestअटक