गोडाऊनला लागलेल्या आगीत एकाचा भाजून मृत्यू;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:10 IST2021-03-27T04:10:50+5:302021-03-27T04:10:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गंज पेठेतील मासेआळी भागात भंगार मालाच्या गोडाऊनला गुरुवारी (दि.२५) मध्यरात्री आग लागली. या आगीमध्ये ...

गोडाऊनला लागलेल्या आगीत एकाचा भाजून मृत्यू;
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गंज पेठेतील मासेआळी भागात भंगार मालाच्या गोडाऊनला गुरुवारी (दि.२५) मध्यरात्री आग लागली. या आगीमध्ये एक व्यक्ती भाजल्यामुळे गंभीररित्या जखमी झाला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या मयत व्यक्तीच्या अहवालामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. शॉटसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शिवकांत सुतार (वय २८, रा. उत्तर प्रदेश) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गंज पेठेतील मासेआळी कॉर्नर जवळील आर.के स्क्रँप सेंटरचे गोडाऊन आहे. त्याला रात्री १ वाजून २० मिनिटांनी आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी १५ ते १८ मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणली. मात्र, यामध्ये गंभीररीत्या भाजलेल्या सुतार यांचा मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक शॉर्टसर्किट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायरमधून करंट पसरला आणि त्यानंतर आग लागली. शिवकांत सुतार यांना शॉक बसल्याने ते अडकले व भाजले. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------