मारहाणप्रकरणी एकाला अटक

By Admin | Updated: June 17, 2014 03:06 IST2014-06-17T03:06:06+5:302014-06-17T03:06:06+5:30

घरभाड्याचे पैसे बुडविल्याच्या कारणावरून आठ जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज लुटला

One arrested for rioting | मारहाणप्रकरणी एकाला अटक

मारहाणप्रकरणी एकाला अटक

पिंपरी : घरभाड्याचे पैसे बुडविल्याच्या कारणावरून आठ जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज लुटला. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक केली आहे, तर सातजण फरार आहेत. ही घटना रविवारी पहाटे बिजलीनगर, चिंचवड येथील राजमाता सावित्रीबाई कॉम्प्लेक्स येथे घडली.
राकेश विकास विसपुते (वय २४, रा. राजमाता सावित्रीबाई कॉम्प्लेक्स, बिजलीनगर, चिंचवड) यांच्यासह टेम्पोचालकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी जीवन शिवाजी शेंडगे (वय २८, रा. साम्राज्य बंगला, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला अटक केली आहे, तर गणेश खांगटे (रा. बिजलीनगर, चिंचवड), शुभम सूर्यवंशी, अखिल शेख, गणेश शिंदे, योगेश फुरडे, समीर शेख, इरफान शेख हे फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजमाता सावित्रीबाई कॉम्प्लेक्स येथे विसपुते भाडेतत्त्वावर राहत होते. ते मळवली फाटा येथे भाड्याने दुसरी खोली घेऊन त्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले होते. त्याच वेळी आरोपी शुभम सूर्यवंशीने विसपुते यांना शिवीगाळ करीत ‘का रे, भाडे न देताच पळून चालला का’ असे म्हणत दमदाटी केली. तसेच फायबरच्या पाइपने पाठ, पोट व पायावर मारहाण केली. इतर आरोपींनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या ठिकाणी असलेला टेम्पोचालक भांडणे सोडविण्यासाठी गेला असता त्यांनाही आरोपींनी मारहाण करीत टेम्पोचे नुकसान केले. त्यानंतर आरोपींनी विसपुते यांना जवळच असलेल्या रेल्वे ट्रॅकवर नेले. ‘भाड्याचे पैसे आत्ताच दे नाही, तर हात-पाय तोडू’ अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांना एका खोलीत डांबून ठेवले. खांगटे याने त्यांच्या डोक्यात बीअरची बाटली फोडली, तर इतर आरोपींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाईल व रोकड असा ८५ हजारांचा ऐवज काढून घेतला. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.(प्रतिनिधी)

Web Title: One arrested for rioting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.