खूनप्रकरणी एकाला अटक

By Admin | Updated: June 13, 2014 04:59 IST2014-06-13T04:59:33+5:302014-06-13T04:59:33+5:30

दांडेकर पुलाजवळील राजीव गांधीनगरमध्ये तरुणाच्या खूनप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी एकाला अटक केलीे आहे. न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

One arrested for murder | खूनप्रकरणी एकाला अटक

खूनप्रकरणी एकाला अटक

पुणे : दांडेकर पुलाजवळील राजीव गांधीनगरमध्ये तरुणाच्या खूनप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी एकाला अटक केलीे आहे. न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
विलास वसंत मोहिते (वय २६, रा. दांडेकर पूल, सिंहगड रस्ता) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी यापूर्वी सहा जणांना अटक केली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. सागर राजू वाघमारे (वय २६, रा. दत्तवाडी) याचा १२ मे रोजी धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला होता. नंदा साळुंके यांनी फिर्याद दिली आहे. नंदा साळुंके यांचा मुलगा धनराज आणि त्याचा मित्र सागर वाघमारे हे दोघेही येथील घाटावर गप्पा मारत होते. त्यावेळी आरोपींनी खून केला. या घटनेत फिर्यादी, त्यांचा मुलगा धनराज व मुलगी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. अटक आरोपी व फिर्यादी यांच्या मुलांमध्ये मूळ भांडण आहे. (प्रतिनिधी)

Web Title: One arrested for murder