शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शिकाऊ तसेच पक्क्या वाहन परवान्यासाठी दीड महिन्यांचे ‘वेटिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 07:00 IST

शिकाऊ तसेच पक्क्या परवान्यासाठीचा दैनंदिन कोटा सातत्याने वाढविला जात आहे...

ठळक मुद्दे प्रतीक्षा यादी आटोक्यात येईना :‘आरटीओ’ टप्याटप्याने वाढतेय कोटा

पुणे : शिकाऊ तसेच पक्क्या वाहन परवान्यासाठी वाहन चालकांना दीड महिन्यांची प्रतिक्षा करावी लागत आहे. ऑनलाईन पध्दतीने पूर्वनियोजित दिवस व वेळ मिळाल्यानंतरच परवान्यासाठी चाचणी घेतली जाते. पण सध्या दुचाकीसह सर्वप्रकारच्या वाहनांचा परवाना मिळविण्यासाठी जवळपास दीड महिने वाट पाहावी लागत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालया (आरटीओ)कडून पूर्वनियोजित वेळेचा कोटा सातत्याने वाढविला जात असला तरी प्रतिक्षा यादी आटोक्यात येताना दिसत नाही.वाहनाचालकांना शिकाऊ किंवा पर्मनंट वाहन चालन परवान्यासाठी वाहन प्रणालीवरून ऑनलाईन पुर्वनियोजित वेळ घ्यावी लागते. त्यानंतरच संबंधित दिवशी चाचणी घेतली जाते. मागील काही वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू असल्याने वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी वाहनचालकांना थेट कार्यालयात येऊन चाचणी द्यावी लागत होते. पण त्यामुळे वाहनचालकांची मोठी गर्दी होऊन यंत्रणेवर ताण येत होता. आॅनलाईन प्रक्रियेमुळे त्यामध्ये सुटसुटीतपणा आला आहे. मात्र, दर दिवशीचा चाचणीचा कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. हा कोटा पूर्ण झाल्यानंतर पूर्वनियोजित वेळ मिळत नाही. संबंधित चालकांना पुढील दिवसाची वेळ घ्यावी लागते. सुरूवातीला कोटा खूपच कमी असल्याने वेळ मिळविण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागत होता. त्यामुळे वाहनचालक हैराण होत होते. यापार्श्वभूमीवर ‘आरटीओ’कडून टप्याटप्याने कोटा वाढविण्यात येत आहे. त्यामुळे प्रतिक्षा कमी झाली असली तरी आणखी दीड महिन्यांचे ‘वेटिंग’ आहे. वाहनचालकांना दीड महिन्यानंतरची वेळ मिळत आहे. शिकाऊ परवान्यासाठी संगम ब्रीज येथील आरटीओ कार्यालयामध्ये चाचणी होते. तेथील दैनंदिन कोटा ५५० एवढा आहे. तर दुचाकी व रिक्षा साठीचा दैनंदिन कोटा अनुक्रमे ३६० व ३० एवढा करण्यात आला आहे. ही चाचणी फुलेनगर येथे घेतली जाते. भोसरी येथील ‘आयडीटीआर’च्या ट्रॅकवर हलके मोटार वाहनांची चाचणी घेतली जाते. येथील दैनंदिन कोटा ४०० पर्यंत वाढविला आहे. त्यानंतरही वाहनचालकांना दीड महिन्यांची प्रतिक्षा करावी लागत असल्याची स्थिती आहे.---शिकाऊ तसेच पक्क्या परवान्यासाठीचा दैनंदिन कोटा सातत्याने वाढविला जात आहे. पुर्वनियोजित वेळेचा कालावधी खुप कमी झाला आहे. पक्क्या परवान्यासाठी दुचाकीला ४० दिवस तर चारचाकी सुमारे ४५ दिवसांची प्रतिक्षा करावी लागत आहे. पुर्वी हा कालावधी खुप जास्त होता.- विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  ...........नवीन वाहन नोंदणी आज सुरू राहणारपुणे : दसरा सणाच्या मुहूर्तावर नवीन वाहनांची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. या नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून ताबा मिळावा, यासाठी मंगळवारी (दि. ७) प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरू ठेवले जाणार आहे, अशी माहिती आरटीओ अजित शिंदे यांनी दिली.दरवर्षी दसºयाच्या दिवश्ी मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी केली जाते. नोंदणी क्रमांक मिळाल्याशिवाय या वाहनांचा ताबा वाहनमालकाला मिळत नाही. यादिवशी ‘आरटीओ’ला शासकीय सुट्टी असते. पण नागरिकांच्या सुविधेसाठी हे कार्यालय मंगळवारी सुरू ठेवले जाणार आहे. संगम ब्रीज येथील आरटीओ कार्यालय, आळंदी रस्ता चाचणी मैदान येथील नवीन वाहन नोंदणीविषयक कामकाज  सुरू ठेवणार आहे. तात्पुरती वाहन नोंदणी, नवीन वाहन नोंदणी तसेच कर वसुलीचे काम करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर