शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत सव्वा टीएमसी पाणीसाठा, सव्वा महिन्याची चिंता मिटली

By नितीन चौधरी | Updated: June 17, 2025 18:17 IST

खडकवासला प्रकल्पात एकूण साडेसहा टीएमसी पाणीसाठा

पुणे : गेल्या तीन दिवसांपासून खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे सव्वा टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा शहराला सव्वा महिना पुरेल. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमधील पाणीसाठा मंगळवारी सायंकाळी साडेसहा टीएमसी अर्थात २२.२६ टक्क्यांवर पोचला. खडकवासला हे धरण ५८.८८ टक्के भरले असून धरणांच्या परिसरात असाच पाऊस सुरू राहिल्यास धरणे १५ जुलैपर्यंत भरतील अशी स्थिती आहे.

शहर आणि परिसरात रविवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. हा पाऊस खडकवासला धरण परिसरात आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असून, यामुळे खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. तीन दिवसांपूर्वी अर्थात रविवारी धरणांत सकाळी ८ वाजेपर्यंत ५.२० टीएमसी अर्थात १७.८४ टक्के पाणीसाठा होता. रविवारी सकाळी पावसाला सुरुवात झाली.

त्यानंतर या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत चारही ५.४५ टीएमसी अर्थात १८.७० टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर सलग तीन दिवस पाऊस सुरू असून, मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा साठा साडेसहा टीएमसी अर्थात २२.२६ टक्क्यांवर पोचला. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत एकूण सव्वा टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. हा पाणीसाठा शहराला पुढील सव्वा महिना पुरेल इतका आहे. खडकवासला हे धरण ५८.८८ टक्के भरले असून, धरणांच्या परिसरात असाच पाऊस सुरू राहिल्यास धरणे १५ जुलैपर्यंत भरतील अशी स्थिती आहे.

धरण साठा (टीएमसी) टक्के

खडकवासला १.१६-५८.८८

पानशेत १.८४-१७.२५

वरसगाव ३.३१-२५.८५

टेमघर ०.१८-४.८९

एकूण ६.४९-२२.२६ 

यंदा धरणं लवकर भरणार

दरवर्षी धरणं ही जुलै महिन्यानंतर किंवा ऑगस्ट महिन्यांत भरतात; पण यंदा पावसाचे लवकर आगमन झाले आणि जोरदार बरसला आहे. त्यामुळे धरणं लवकरच भरतील अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणेकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मिटेल, असा अंदाज आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी