शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील प्रसिद्ध डायनिंग हॉलची ऑनलाईन थाळी मागविणे पडले दीड लाखांना

By विवेक भुसे | Updated: September 27, 2022 15:18 IST

जाहिरात पाहून ऑनलाईन मागविण्याचा प्रयत्नात झाली फसवणूक

पुणे : फेसबुकवर अनेकदा आकर्षक जाहिराती सायबर चोरट्यांकडून केल्या जात असतात. त्याला आजवर अनेक जण भुलले असून त्यातून त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड पडला आहे. शहरातील अनेक लोकप्रिय डायनिंग हॉलच्या बाबत फेसबुकवर एकावर एक फ्री अशा जाहिराती सायबर चोरट्यांनी टाकलेल्या आहेत. त्यातून आजवर अनेकांची फसवणूक होत असल्याचे दिसून आले आहे.

फेसबुकवर सुकांता थाळीची जाहिरात पाहून ऑनलाईन ऑर्डर करण्याचा प्रयत्न एका महिलेच्या चांगल्याचा अंगलट आला. सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून १ लाख ५२ हजार ३२१ रुपये काढून घेऊन फसवणूक केली.याप्रकरणी कोरेगाव पार्क येथील ३९ वर्षाच्या नागरिकाने कोरेगाव पार्क दिली आहे. हा प्रकार २७ ऑगस्ट रोजी घडला होता. फिर्यादी यांच्या पत्नीने फेसबुकवर सुकांता थाळीची जाहिरात पाहून त्यावरील मोबाईलवर संपर्क साधला. तेव्हा सायबर चोरट्याने त्यांना एक अँप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यामध्ये त्याने क्रेडिट कार्डची माहिती भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी कार्डची माहिती भरल्यावर त्यांच्या मोबाईलचा ऍक्सेस सायबर चोरट्याने घेऊन त्यांच्या खात्यातून १ लाख ५२ हजार ३२१ रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. त्याबाबत त्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भुजबळ तपास करीत आहेत.

जाहिरातींना भुलून न जाता त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करा

शहरात यापूर्वी अनेक डायनिंग हॉलच्या बाबतीत फेसबुक व इतर सोशल मीडियावर बनावट जाहिराती सायबर चोरट्यांनी टाकल्या होत्या. त्यातून अनेकांची फसवणूक झाली. सायबर पोलीस ठाण्यात अशा अनेक तक्रारी दाखल आहेत. त्यानंतर पोलिसांनी संबधित डायनिंग हॉलला सूचना देऊन तशा आवाहन सोशल मीडियावर करण्यास सांगितले होते. त्यानंतरही अशा बनावट जाहिराती अजूनही दिसून येत आहे. नागरिकांनी अशा जाहिरातींना भुलून न जाता त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकfoodअन्नfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी