शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा कारागृहात पुन्हा राडा; एकाच्या डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 15:04 IST

येरवडा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींमध्ये झालेल्या वादातून तिघा जणांनी हिंदु सेनेचा समर्थक तुषार नामदेव हंबीर याच्यावर खिळ्याने वार करुन जखमी केले होते़.

ठळक मुद्देयाप्रकरणी येरवडा पोलिसांनी १४ कैद्यांवर गुन्हा दाखलयेरवडा कारागृहात गेल्या काही दिवसांपासून हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ

पुणे : येरवडा कारागृहात मंगळवारच्या घटनेनंतर आज पुन्हा एकदा राडा झाला असून पाच ते सहा जणांनी महंमद जबाल नादाफ (वय ३५) कैद्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला़. नादाफ याची प्रकृती गंभीर आहे़ त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़. येरवडा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींमध्ये झालेल्या वादातून तिघा जणांनी हिंदु सेनेचा समर्थक तुषार नामदेव हंबीर याच्यावर खिळ्याने वार करुन जखमी केले होते़. हा प्रकार मंगळवारी सकाळी घडल्यानंतर तुषार हंबीर याच्या साथीदारांनी शाहरुख खान याच्यावर हल्ला केला़. त्याला सोडविण्यासाठी गेलेले तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे यांना धक्काबुक्की करुन मारहाण केली होती़. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी १४ कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे़. या घटनेनंतर आज सकाळी महंमद जबाल नादाफ याच्यावर पाच ते सहा जणांनी महंमद याला बेदम मारहाण करुन डोक्यात दगड घातला़ रक्तबंबाळ अवस्थेत तुरुंग अधिकाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे़. येरवडा कारागृहात गेल्या काही दिवसांपासून कैद्यांमध्ये सतत हाणामाऱ्या होत असून नुकत्याच झालेल्या अधिवेशनात या प्रकरणी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता़. मात्र, त्यावर शासनाने जुजबी उत्तर दिले होते़. लागोपाठ दोन घटनांमुळे येरवडा कारागृहात खळबळ माजली असून सर्व अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल बंद करुन ठेवले आहेत.कोल्हापूरमध्येही कैद्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी हाणामारी झाली होती. याप्रकरणाची माहिती घेण्यासाठी आज तुरुंग महानिरीक्षक सुनिल रामानंद हे कोल्हापूर दौऱ्यावर गेले आहेत.  आज सायंकाळी येरवड्यातील वाढत्या हाणामारीच्या घटनांवर आपण बैठक घेणार असल्याचे रामानंद यांनी सांगितले.  हिंदु राष्ट्र सेनेचा कट्टर समर्थक तुषार नामदेव हंबीर याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर त्याच्या साथीदारांनी तुरुंगात गस्त घालणाऱ्या तुरुंग अधिकाऱ्याला धक्काबुक्की करीत मारहाण  केली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी १४ न्यायालयीन बंदींवर गुन्हा दाखल केला आहे.राहुल बाळासाहेब तुपे, अक्षय ऊर्फ पप्पु मच्छिंद्र हाके, यशवंत ऊर्फ अक्षय राजेंद्र सूर्यवंशी, पृथ्वीराज राजेंद्र सूर्यवंशी, गौरव प्रदीप जाधव, राहुल बाळासाहेब पानसरे, अक्षय आनंदा चौधरी, अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव, अक्षय लक्ष्मण इंगुळकर, संजय रामचंद्र औताडे, अनिल तुकाराम सोमवंशी, शिवशंकर सस्तानंद शर्मा, प्रविण सुनिल सुतार, निखिल देवानंद पाटील अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपींना विविध गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली असून सध्या त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहेत. याप्रकरणी तुरुंग अधिकारी  संदीप रतन एकशिंगे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक २ मध्ये मंगळवारी सकाळी १० वाजता घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शाहरुख शेख, सलीम शेख आणि अमन अन्सारी यांनी हिंदु राष्ट्र सेनेचा समर्थक तुषार हंबीर याच्यावर मंगळवारी सकाळी पावणे सात वाजता दगड व लोखंडी खिळ्याने गळ्यावर, मानेवर, हातावर मारुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती तुरुंगातील इतर आरोपींना समजली. त्यामुळे सर्कल क्रमांक २ मध्ये ठेवण्यात आलेले हंबीरचे साथीदार हे संतापले होते. संदीप एकशिंगे हे सकाळी दहा वाजता सर्कल २ मध्ये गस्त घालत असताना हे आरोपी शाहरुख अस्लम खान याला मारहाण करीत होते. हे पाहून एकशिंगे हे त्याला सोडवायला गेले. तेव्हा त्या आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करुन मारहाण केली. त्यात त्यांच्या हाताला, तोंडाला मुका मार लागला आहे. येरवडा पोलिसांनी या १४ जणांविरुद्ध दंगल माजविणे, सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :YerwadaयेरवडाjailतुरुंगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस