प्रजासत्ताक दिनानिमित्त जेजुरी गडाला तिरंगी विद्युत रोशनाई, गाभाऱ्यात फुलांची सजावट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 22:58 IST2025-01-26T22:57:12+5:302025-01-26T22:58:13+5:30
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा आज ७६ वा वर्धापन दिन असल्याने ही सजावट करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त जेजुरी गडाला तिरंगी विद्युत रोशनाई, गाभाऱ्यात फुलांची सजावट
जेजुरी, दि. २६ श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे खंडोबा मंदिरास तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच मुख्य गाभारा फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. गडकोटामध्ये भारत मातेची प्रतिकृती तयार करून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा आज ७६ वा वर्धापन दिन असल्याने ही सजावट करण्यात आली आहे.
यावेळी देव संस्थांचे विश्वस्त मंगेश घोणे, पोपट खोमणे, पूजारी सेवेकरी व कर्मचारी वर्ग यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिकृतीला फुलांची उधळण करीत भारत माता की जय, वंदे मातरम व येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा देण्यात आल्या.