शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या पुणे शहरातील वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 09:52 IST

लष्कर, विश्रांतवाडी भागातही वाहतूक बदल...

पुणे : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि. १४) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतुकीत बदल करून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. यात मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी चौक परिसरातील वाहतूक बदल गर्दी ओसरेपर्यंत लागू राहणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली आहे.

असा असेल बदल...

- शाहीर अमर शेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहने आरटीओ चौक, जहाँगीर चौकमार्गे इच्छित स्थळी जातील.

- जीपीओ चौकातून बोल्हाई माता चौक तसेच मालधक्का चौकाकडे जाणारी वाहने किराड चौक, नेहरू मेमोरिअल चौकमार्गे इच्छित स्थळी जातील.

- पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक नरपतगिरी चाैकातून वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पुणे स्टेशन, अलंकार चित्रपटगृहमार्गे इच्छित स्थळी जावे.

- सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकातून वाहनचालकांनी १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरू रुग्णालय, पवळे चाैक, कुंभारवेस चौकमार्गे इच्छित स्थळी जावे.

- बॅनर्जी चौकातून पाॅवर हाउस चौक, नरपतगिरी चौक, १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरू रुग्णालय, पवळे चौकमार्गे इच्छित स्थळी जावे.

येथे करा वाहन पार्किंग :

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येणाऱ्या अनुयायांसाठी वाहने लावण्याची व्यवस्था आरटीओ कार्यालय, एसएसपीएमएस मैदान, पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ, ससून काॅलनी येथे करण्यात आली आहे.

लष्कर, विश्रांतवाडी भागातही वाहतूक बदल

लष्कर भागातील अराेरा टाॅवर्स परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील आणि विश्रांतवाडी चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. या भागातून मिरवणूक काढण्यात येत असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दांडेकर पूल चौकात रात्री वाहतूक बदल :

सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल चौकातील विविध मंडळांकडून डाॅ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते. गुरुवारी (दि. १३) रात्री आठनंतर या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. गर्दी ओसरेपर्यंत दांडेकर पूल परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड