पुण्यात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त १ लाख नागरिकांना ५ हजार किलो मिसळ अन् ताक वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 04:33 PM2023-04-14T16:33:07+5:302023-04-14T16:33:30+5:30

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनविलेल्या मिसळ व ताकाचे मोफत वाटप

On the occasion of Babasaheb ambedkar birth anniversary in Pune 5 thousand kg misal and buttermilk were distributed to 1 lakh citizens | पुण्यात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त १ लाख नागरिकांना ५ हजार किलो मिसळ अन् ताक वाटप

पुण्यात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त १ लाख नागरिकांना ५ हजार किलो मिसळ अन् ताक वाटप

googlenewsNext

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी पुण्यात ५ हजार किलो मिसळ व १ लाख नागरिकांकरिता ताक तयार करून वाटप करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉ. आंबेडकर जयंती निमित्ताने लोकसहभागातून एकूण तब्बल १० हजार किलो मिसळ वाटप करण्यात आले. 

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा  येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी ही मिसळ व ताक तयार केले. शुक्रवारी पहाटे ३ पासून मिसळ व ताक करण्याकरिता तयारी सुरु झाली. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील सर्व राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष व प्रमुखांच्या  उपस्थितीत सकाळी ८ वाजता भव्य अशा कढई मध्ये सर्व पदार्थ व मसाले घालून ज्योत पेटविण्यात आली. त्यानंतर एका कढईत संपूर्ण मिसळ व दुसऱ्या भव्य कढईत ताक तयार झाले. डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता आलेल्या सर्व नागरिकांना मिसळ व १ लाख बंधू-भगिनींना ताक वाटप करण्यात आले.

ज्येष्ठ शिक्षणतज्ञ पी.ए.इनामदार, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रशांत जगताप, पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष मोहिते, विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, पुण्याचे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष  ,शिक्षण प्रसारक मंडळींचे जया किराड, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे खजिनदार अजय पाटील, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ आदी मान्यवर उपक्रमाला उपस्थित होते. 

उपक्रमामध्ये ५ हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी ५०० किलो, कांदा ३०० किलो, आलं १०० किलो, लसूण १०० किलो, तेल ३५० किलो, मिसळ मसाला १३० किलो, लाल मिरची पावडर २५ किलो, हळद पावडर २५ किलो, मीठ २० किलो, खोबरा कीस ७० किलो, तमाल पत्र ५ किलो, फरसाण १२०० किलो, पाणी ४००० लिटर, कोथिंबीर ५० जुडी इत्यादी साहित्य वापरण्यात आले. तसेच ताक बनवण्याकरता देखील मोठ्या प्रमाणात दही, मीठ, कोथिंबीर सह इतर साहित्य वापरण्यात आले. 

Web Title: On the occasion of Babasaheb ambedkar birth anniversary in Pune 5 thousand kg misal and buttermilk were distributed to 1 lakh citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.