शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात आजीबाईंनी मांडला ठिय्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 09:39 IST

सर्वांचेच दुर्लक्ष : लाडकी बहीण योजनेत समावेशाची मागणी

पुणे : सरकारच्या लाडकी बहीण योजनेत समावेश व्हावा, अशी मागणी करत शहरातील वृद्ध महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बुधवारी दुपारी धरणे धरले. त्यांच्याकडे ना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष दिले, ना तिथे अन्य कारणांसाठी येत असलेल्या राजकारण्यांनी. आंदोलनात काही वृद्ध महिलांना त्रास होऊ लागल्याने संयोजकांनी अखेर जानेवारीत वृद्ध महिलांची मोठी परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेऊन आंदोलन थांबवले.

महिला आत्मसन्मान अभियान अंतर्गत हे धरणे आंदोलन करण्यात आले. अभियानाच्या संयोजक शैलजा अराळकर यांनी या महिलांना बोलते केले. एकएक महिला स्वत:च्या व्यथा मांडत होत्या. श्रावणबाळ योजनेत अटी जाचक आहेत. कागदपत्रांसाठी खर्च जास्त असूनही त्या अटी पूर्ण होत नाहीत. लाडकी बहीण योजनेत अटी कमी, कागदपत्रं कमी, खर्च फक्त दहा रुपये, पण या योजनेत ६५ वर्षे वयापुढील महिलांना लाभ नाही, ही अट रद्द करावी, अशी मागणी त्या करत होत्या.

रिक्षा पंचायतचे सरचिटणीस नितीन पवार, समाजवादी अध्यापक सभेच्या ऊर्मिला पवार, गोरख मेंगडे यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केले. आंदोलन सुरू असताना काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास आले होते, मात्र धरणे आंदोलनात बसलेल्या या महिलांची दखल त्यांनी घेतली नाही. त्याची खंत संयोजक आदित्य व्यास, अरोळकर यांनी व्यक्त केली.निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांनी सरकारपर्यंत भावना पोहोचवण्यात येतील असे सांगितले. काही वृद्ध महिलांना त्रास होऊ लागल्याने संयोजकांनी आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला. जानेवारीत महिला परिषद आयोजित करून त्यात हीच मागणी करण्याचे ठरवण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाWomenमहिला