शेतात तुटून पडलेल्या तारेचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:08 IST2021-06-23T04:08:55+5:302021-06-23T04:08:55+5:30

दामू नामदेव गोपाळे (रा. साबुर्डी, ता. खेड) असे वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. २२) सकाळी ९.३० ...

An old man dies after being hit by a broken star in a field | शेतात तुटून पडलेल्या तारेचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू

शेतात तुटून पडलेल्या तारेचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू

दामू नामदेव गोपाळे (रा. साबुर्डी, ता. खेड) असे वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. २२) सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. साबुर्डी येथे गोपाळे यांच्या शेतातून विजेचे खांब गेले आहेत. काही दिवसांपूर्वी या पोलवरील एक वीजवाहक ता. तुटून शेतात पडली होती. मंगळवारी सकाळी शेतात गोपाळे यांचा मुलगा पेरणी करत होता. दरम्यान, दामू गोपाळे हे शेतातून फावडी घेऊन जनावरांच्या गोठ्याकडे जात असताना शेतात तुटून पडलेल्या वीजवाहक तारेवर पाय पडल्यामुळे विजेचा जोरदार शॉक बसून दामू गोपाळे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबाबत गोपाळे यांचा मुलगा शरद दामू गोपाळे (रा. साबुर्डी, ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: An old man dies after being hit by a broken star in a field