ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने वृध्दाचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:15+5:302020-12-02T04:11:15+5:30

उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे पाठीमागील चाक अंगावरुन गेल्याने एका ७४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ...

An old man died when the wheel of a tractor filled with sugarcane overturned | ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने वृध्दाचा मृत्यु

ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने वृध्दाचा मृत्यु

उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे पाठीमागील चाक अंगावरुन गेल्याने एका ७४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. १) दुपारी दोनच्या सुमारास माळेगांव कॉलनी येथे घडली.

सोपान रामचंद्र पवार (वय ७४, रा. खांडज, ता. बारामती) असे या अपघातात मृत्यू झालेल्या नागरीकाचे नाव आहे.याबाबत योगेश दिलीप पवार (रा. माळेगाव कॉलनी, शारदानगर) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे घरी असताना त्यांचे चुलते अनिल लक्ष्मण पवार यांनी ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक सोपान पवार यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यूमुखी पडल्याचे फिर्यादीना कळविले. त्यानुसार फिर्यादीने तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली.

Web Title: An old man died when the wheel of a tractor filled with sugarcane overturned