शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

ओल्ड इज अलवेज ‘गोल्ड ’...... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 18:11 IST

इतरांसारखेच आयुष्यामागे धावत असताना त्यांना काळाच्या पडद्याआड गेलेल्या गाड्या आकर्षित करतात आणि मग सुरु होतो एका हटके आयुष्याचा प्रवास... जाणून घेऊया.. नेमकी काय आहे गोष्ट..

ठळक मुद्देकाळाच्या पडद्याआड गेलेल्या दुचाकींचा संग्राहकआजदेखील संग्रहित असलेल्या सर्व गाड्या चांगल्या शोरूम कंडिशनमध्ये राजदूत, येझडी, जीटीएस बॉबी, बजाज सुपर गाड्यांचा समावेश

दीपक कुलकर्णी पुणे : जुनं ते सोनं अशी आपल्याकडे एक प्रचलित म्हण आहे.. त्यामुळे जुनी गाणी, वस्तु, पुस्तके, चित्रपट, सायकल , दुचाकी, चारचाकी गाडी असे सर्व काही..पुढे जगणे कितीही प्रगतीपथावर धावले तरी अंतर्मनातला एक कप्पा ‘ जुन्या-पुरान्या ’ गोष्टींसाठी राखीव असतो. पण त्याच जुन्या गोष्टी जतन करणे काहींच्या आयुष्याचा भाग होऊन जातो..आणि तसाही छंद नसणारा माणूस या जगात सापडणे कठीणच..  ‘ओल्ड इज अलवेज गोल्ड ’ असं तत्व आयुष्यभर जपत विस्मृतीत गेलेल्या पन्नास, साठ , सत्तर वर्षांच्या दुर्मिळ गाड्या हुडकुन काढत त्यांना जतन करणारा हा अवलिया माणूस म्हणजे सॅलिसबरी पार्क येथे राहणारे अशोक धुमाळ...     मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेलं हे व्यक्तिमत्व.. इतरांसारखेच आयुष्यमागे धावत असताना त्यांना काळाच्या पडद्याआड गेलेल्या गाड्या आकर्षित करतात आणि मग सुरु होतो एका अविस्मरणीय आयुष्याचा प्रवास...जुन्या काळच्या गाड्या जमविण्याचा हा छंद त्यांचे अख्खं आयुष्यच व्यापून टाकतो. या माणसाकडे १९६९, ७२ सालच्या अशा गाड्यांचा सुंदर संग्रह आहे. ज्यांचे दिसणेच नव्हे, तर नावे ही सध्या दुरापास्त गोष्ट. त्यातलीच एक म्हणजे १९७३ साली आलेल्या बॉबी चित्रपटात वापरण्यात आलेली व त्यावेळेस लाखो तरुणांच्या दिलाची धडकन ठरलेली राजदूत जीटीएस. अर्थातच बॉबी. यांसारख्या एकाहून एक लक्षवेधी व भन्नाट गाड्या या माणसाच्या संग्रहात आहे. धुमाळ यांच्याकडे सध्या जावा, राजदूत, येझडी, जीटीएस बॉबी, बजाज सुपर अशा गाड्यांचा संग्रह आहे. त्यांना त्याकाळी कुटुंबाची हलाखीची परिस्थिती व नवीन रोल गाड्यांची किंमत यांचा ताळमेळ घालणे परवडण्याजोगे नव्हते. मग त्यांनी याच गाड्या स्वत: जशाच तशा स्वरूपात घरी तयार करण्याचे तंत्र आत्मसात केले. या गाड्यांची निर्मिती करताना कधी कधी त्यांना एका एका पार्टच्या शोधासाठी पायाला भिंगरी लावत जिल्हे, राज्ये, पालथी घालावी लागली. एक एक गाडी तयार करण्यासाठी महिने, वर्ष सरत होती. परंतु तयार केलेल्या गाडीकडे जेव्हा रस्त्यावरची माणसे आश्चर्यकारक भावमुद्रेने पाहत होते तेव्हा त्यांना आपल्या कष्टाचे सार्थक झाल्यासारखे वाटत असे.धुमाळ म्हणाले, आजदेखील संग्रहित असलेल्या सर्व गाड्या चांगल्या शोरूम कंडिशनमध्ये आहे. २५०, १५०, १७५ सीसीच्या या गाड्या आहेत. अगदी निश्चिंतपणे या सर्व गाड्या लांब पल्ल्याच्या दौºयावर घेऊन जातो. ही सर्व वाहने त्रासदायक ठरत नाहीत आणि जरी समजा प्रवासात काही समस्या उद्भवली तरी ती सहज दूर होऊ शकते. गाड्यांचे वैशिष्ट्ये म्हणजे यांची दुरुस्ती कुणालाही सहज जमू शकते. परंतु सिग्लनवर उभा असलो तरी नवीन बुलेट गाडीपेक्षा या जुन्या गाड्या तरुणाईला आकर्षित करून घेत असतात. मध्यंतरी राजदूत या गाडीचे टायर हवे होते. त्याच्या शोधाकरिता कोपरगाव, शिर्डी, बडोदा अशा विविध ठिकाणी फिरलो. पण ते काही केल्या मिळेना. ते शेवटी मला बंगळूर व बेळगावला मिळाले. माझ्यामुळे या गाड्यांविषयी मुलाला व मुलीला देखील प्रचंड जिव्हाळा निर्माण झाला आहे. याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले. मुलीच्या लग्नात लग्नमंडपातली एंट्रीदेखील तिने मैत्रिणींसह गाड्यांवर केली

........

जेव्हा हा पहाडासारखा माणूस गाड्यांच्या विरहात ढासळतो...हाच माणूस जेव्हा आर्थिक संकटापुढे नतमस्तक होताना आपल्याकडे असलेल्या १९५९, ६९ सालच्या फियाट गाड्या विकाव्या लागल्या हे सांगतो तेव्हा नकळत त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतात. तसेच काही स्पेअरपार्ट मिळत नसल्यामुळे ५० सीसीची व्हिक्टोरिया म्हणजे विकी आणि सुवेगा या गाड्या स्क्रॅप कराव्या लागल्या हे सांगताना तो खूप हळवा होतो. रात्री व दिवसा जेव्हा कधी निवांत वेळ मिळतो त्याक्षणी या गाड्यांकडे पाहतो तेव्हा मोठे समाधान मिळते. 

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरcinemaसिनेमा