सणसवाडी-तळेगाव रस्त्यावर तेलाचा टेम्पो उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:11 IST2021-04-02T04:11:59+5:302021-04-02T04:11:59+5:30

सणसवाडी (ता. शिरूर) येथील एल & टी फाटा येथून तळेगाव ढमढेरे येथील एका व्यापाऱ्याला तेलाचे डबे देण्यासाठी पुणे येथून ...

Oil tempo reversed on Sanaswadi-Talegaon road | सणसवाडी-तळेगाव रस्त्यावर तेलाचा टेम्पो उलटला

सणसवाडी-तळेगाव रस्त्यावर तेलाचा टेम्पो उलटला

सणसवाडी (ता. शिरूर) येथील एल & टी फाटा येथून तळेगाव ढमढेरे येथील एका व्यापाऱ्याला तेलाचे डबे देण्यासाठी पुणे येथून आलेला टेम्पो (एम एच १२ के पी १०२९) माळीमळा नजीक गेल्यानंतर टेम्पोचे पाठीमागील टायर अचानक फुटले त्यामुळे चालक मेदने यांच्य ाआणि टेम्पो रस्त्यावर वाघमोडी वळण घेऊन रस्त्यावर अचानकपणे उलटला व टेम्पोचे तोंड विरुद्ध दिशेला झाले, यावेळी चालक सोमनाथ मेदने व त्याचा साथीदार हे दोघे टेम्पोतून सुखरूपपणे बाहेर निघाले, मात्र या घटनेने रस्ता पूर्णपणे बंद होऊन वाहनाच्या रांगा लागल्या, सदर घटनेची माहिती मिळताच तळेगाव ढमढेरेचे पोलीस पाटील पांडुरंग नरके यांनी त्या ठिकाणी धाव घेत शेजारील रस्त्याने वाहनांना रस्ता मोकळा करून दिला, तर टेम्पोमालकाने दुसऱ्या टेम्पोच्या सहाय्याने सर्व तेलाचे डबे नेले मात्र यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तेल सांडल्याने येथे अपघात होऊ नये म्हणून रस्त्यावर माती टाकून रस्ता सुरक्षित करण्यात आला.

--

फोटो क्रमांक : ०१ तळेगाव ढमढेरे सणसवाडी तेलाचा टेम्पो उलटला

फोटो ओळ – सणसवाडी तळेगाव ढमढेरे रस्त्यावर उलटलेला तेलाचा टेम्पो.

Web Title: Oil tempo reversed on Sanaswadi-Talegaon road