शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

अबब ! पुणे शहरात एकाच दिवशी उच्चांकी ३९९ नवीन कोरोनाबाधित; पाच हजार रूग्णांचा टप्पा पार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 9:10 PM

१७९ कोरोनाबाधित रूग्णांची प्रकृती गंभीर आहे़ तर ४४ रूग्ण व्हेंटिलेटरवर

ठळक मुद्देबाधितांचा आकडा वाढत असतानाच, दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही मोठे

पुणे : पुणे महापालिका हद्दीत प्रथमच एकाच दिवसात उच्चांकी ३९९ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली. यामुळे पुणे शहराने कोरोनाबाधित रूग्णांचा पाच हजाराचा आकडा पार केला असून, सोमवारपर्यंत शहरात एकूण ५ हजार १८१ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. आज आढळून आलेल्या ३९९ रूग्णांमध्ये बहुतांशी रूग्ण हे कंटन्मेंट भागातीलच आहेत.पुणे शहरात एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच, दुसरीकडे मात्र कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही मोठे आहे. सोमवारी १७९ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, आजपर्यंत शहरातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही आता २ हजार ७३५ इतकी झाली आहे. पुणे शहरात कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या जरी ५ हजार १८१ इतकी झाली असली तरी, यापैकी अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार १८२ इतकी आहे. यापैकी १७९ कोरोनाबाधित रूग्णांची प्रकृती गंभीर आहे़ तर ४४ रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे शहरातून पाठविण्यात येणाºया एकूण स्वॅबपैकी दररोज केवळ ९०० स्वॅबची तपासणी एनआयव्ही प्रयोगशाळेत केली जाते. दरम्यान महापालिकेच्या यंत्रणेमार्फत तसेच खाजगी यंत्रणेकडून शहरात सध्या दररोज साधारणत: दीड ते पावणे दोन हजार नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जातात. त्यामुळे आज (सोमवारी) शहरात ६८९ नागरिकांचे स्वॅब घेतले गेले असले तरी, आज प्राप्त झालेल्या ३९९ पॉझिटिव्ह अवहालात रविवार व शनिवारच्या स्वॅब तपासणीचे प्राप्त झालेले अहवालही आहेत.पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कंटन्मेंट झोनमधील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्याची मोहिम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली असल्याने, अधिकाधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण उजेडात येत आहेत. परिणामी त्यांना वेळेत उपचारही मिळत असून, त्यांना अन्य नागरिकांपासून विलग करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासही मदत मिळत आहे.आजच्या ३९९ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ३२९ पालिकेच्या नायडू हॉस्पिटल व अन्य आयसोलेशन सेंटरमध्ये, तर ११ जण ससून हॉस्पिटलमध्ये व ५९ जणांना खाजगी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.------------------दहा जणांचा मृत्यूसोमवारी पुणे शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रूग्णांपैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ससून हॉस्पिटलमधील ६ जणांचा व खाजगी हॉस्पिटलमधील ४ जणांचा समावेश आहे. पुणे शहरात आजपर्यंत कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या २६४ इतकी झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तNavalkishor Ramनवलकिशोर राम