शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्यम! बळीराजाची 'मोठी' बोली; 'राणी'ला तब्बल १,३१,१११ किंमत मिळाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 15:33 IST

राणी या गायीचे वजन साडेपाचशे किलो असून तिने ऐंशी किलो वजनाच्या कालवडीला जन्म दिला.

मंचर: हौसेला मोल नसते. या हौसेपोटीच मग वाट्टेल ती किंमत मोजून आपली आवडीची गोष्ट मिळवली जाते. असाच काहीसा प्रकार मंचर येथे घडला. 'राणी' नावाच्या गायीला एका शेतकऱ्याने तब्बल १ लाख ३१ हजार १११ रुपयांना खरेदी केले. ह्या 'खरेदी'ची चर्चाच झाली नसती तरच नवल.

मंचर येथील शेतकरी गणेश अनंतराव खानदेशे यांच्या राणी नावाच्या गाईला वाघापूर येथील शेतकऱ्याने तब्बल एक लाख एकतीस हजार एकशे अकरा रुपयांना विकत घेतले आहे. वेगळी वैशिष्ट्ये असलेल्या या राणी गायीचे सध्या सोशल मीडियावर कौतुक सुरू असून परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे.       पुणे जिल्ह्यातील मंचर येथील गणेश अनंतराव खानदेशे यांच्या गोठ्यातील राणी नावाच्या गायीचं  कौतुक केले जात आहे. त्यांनी पंजाबमधून ऐंशी हजाराला एक गाय खरेदी केली होती. तिला इकडे आल्यानंतर वासरू झाले.मग योग्य व्यवस्थापनातून त्यांनी ह्या गाय वासरांचे उत्कृष्ट संगोपन केले.आठ दिवसात दोन वेळेस 25 लिटर दुध देत आहे.  

राणी या गायीचे वजन साडेपाचशे किलो असून तिने ऐंशी किलो वजनाच्या कालवडीला जन्म दिला. ही गाय अतिशय शांत स्वभावाची आहे, रंगाने सफेद ,काळीबांडी, शरिराचा पुढील भाग लहान व मागील भाग मोठा, दोन दाती, कान डोके लहान, सडात योग्य अंतर आहे. कासेची ठेवण गुडघ्याच्या वर,मागील पायाची बाजू सरळ,या इतर सर्व बाबी वैशिष्ट्यपूर्ण असल्याने वाशीम, सांगली,कोल्हापूर, जालना, धुळे, नाशिक, सोलापूर, सातारा, नांदेड, औरंगाबाद, बीड, अहमदनगर, पुणे या भागातील लोक गाय पाण्यासाठी व खरेदीसाठी आले होते.

महाराष्ट्रात आपल्या वातावरणात तयार झालेली ABS ब्रीडची जास्त दुध देणारी गाय असल्याने दुधाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसताना देखील या सर्वगुणसंपन्न आंबेगावच्या राणी गायीची उच्चांकी भावाने एक लाख एकतीस हजार एकशे अकरा रुपये रुपयांना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वाघापूर गावचे प्रगतशील शेतकरी व आदर्श गोपालक विश्वास रकटे पा.यांनी मंचर येथून खरेदी केली.यावेळी वाघापूर येथील दूध संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब औटी, संगमनेर येथील युवा उद्योजक रविशेठ हासे, खेड तालुक्यातील उद्योजक  वैभव पोकळे पाटील, राहूल शेटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेcowगायFarmerशेतकरी