शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बापरे ! पुणे जिल्ह्यात ७४६ ग्रामपंचायतींसाठी २१,७७१ उमेदवारांचे अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 13:51 IST

अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी सर्व तहसिलदार कार्यालयात प्रचंड गर्दी आणि गोंधळ

ठळक मुद्देजिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी दि.30 होती अखेरची मुदत

पुणे: जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि.30) रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या सर्वच तालुक्यात उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याने प्रचंड गोंधळ उडाला. त्यात ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा सर्व्हर काही काळ बंद पडल्याने या गोंधळात अधिकच भर पडली. अखेर जिल्ह्यातील 6 हजार 980 जागांसाठी 21 हजार 771 उमेदवारांनी अर्ज दाखल केला. 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उडालेला गोंधळ, नेटवर्कची समस्या आणि इंटरनेटचे स्पीड यामुळे अनेक उमेदवार अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन अखेरच्या क्षणी राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईनसह ऑफ लाईन देखील अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी बुधवार (दि.30) अखेरची मुदत होती. परंतु ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज दाखल करताना चांगलीच तारांबळ उडाली . त्यात अर्ज दाखल शेवटचा दिवस असल्याने एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने कोरोनाच्या सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचा पुरता फज्जा उडाला. ------जिल्ह्यात निवडणुका होणा-या ग्रामपंचायती : 746- एकूण सदस्य संख्या : 6980- एकूण प्रभागांची संख्या : 2691- एकूण मतदान केंद्रे : 3008 ------- पुरूष मतदार : 8 लाख 59 हजार 996- स्त्री मतदार : 7 लाख 86 हजार 559- यावेळी पहिल्यांदा मतदान : 1 लाख 65 हजार ------जिल्ह्यातील निवडणुका होणा-या तालुकानिहाय ग्रामपंचायतीची संख्या व दाखल झालेले अर्ज खेड -91( 2028) भोर-73( 1264) शिरूर-71(2585), जुन्नर-66(1691) पुरंदर-68(1662), इंदापूर-60(2291), मावळ - 57(1596), हवेली- 54(1802), बारामती- 52(2255), दौंड - 51(2272), मुळशी - 45(1149), वेल्हा - 31(430), आंबेगाव- 29(746) एकूण : 746 ---------किती ग्रामपंचायती बिनविरोध होणार 4 जानेवारीला कळणार पुणे जिल्ह्यात 746 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून, 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी तब्बल 21771उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व अर्जांची गुरुवार (दि.31) डिसेंबर रोजी छाननी होणार असून,  उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 जानेवारी आहे. यामुळे जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती बिनविरोध होणार हे 4 जानेवारीला निश्चित होईल. ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी सध्या अनेक प्रकारच्या बोली लावल्या जात आहेत. ------

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकonlineऑनलाइन