शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त भत्ते होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 1:05 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : समितीचा अहवाल स्वीकारला

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाºयांना वेतनाव्यतिरिक्त दिले जाणारे अतिरिक्त भत्ते बंद करण्याची समितीने केलेली शिफारस विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने स्वीकारली आहे. त्याची अंमलबजावणी येत्या १ एप्रिल २०१९ पासून केली जाणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाºयांना वेतनाव्यतिरिक्त दूरध्वनी भत्ता, वाहनभत्ता, सुपरवायझरी भत्ता, परीक्षा विभागात काम करण्याचा गोपनीय भत्ता आदी असंख्य भत्त्यांची खैरात केली जात असल्याच्या तक्रारी विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. याबाबतची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. समितीने या अतिरिक्त भत्त्यांची पडताळणी केली असता यातील अनेक भत्ते अतिरिक्त ठरत असल्याचे निष्पन्न झाले. ज्या कामासाठी अधिकारी व कर्मचाºयांची नेमणूक झाली आहे, त्याच कामासाठी त्यांना पुन्हा अतिरिक्त भत्ते देणे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार हे भत्ते बंद करण्याची शिफारस समितीने केली होती. व्यवस्थापन परिषदेपुढे समितीचा हा अहवाल ठेवण्यात आला. परिषदेने हा अहवाल स्वीकारून त्याची १ एप्रिल २०१९ पासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.विद्यार्थ्यांना फूड मॉलमध्ये मिळणार आवडीनुसार खाद्यपदार्थसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी विभागाजवळच्या मैदानावर प्रशस्त फूड मॉल उभारण्यात येणार आहे. या फूड मॉलमध्ये आठ स्टॉल असतील. या स्टॉलमध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जातील. येत्या ४ ते ५ महिन्यांत या फूड मॉलची उभारणी होणार आहे. एकाच वेळी तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी येथे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतील. विद्यापीठातील वसतिगृहामध्ये राहणाºया विद्यार्थ्यांना खाण्या-पिण्याबाबत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, या पार्श्वभूमीवर फूड मॉलमुळे त्यांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.येत्या वर्षभरात उभे राहणारतीन हजार आसनक्षमतेचे सभागृह४सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीच्या शेजारील मैदानावर ३ हजार आसनक्षमतेचे प्रशस्त सभागृह येत्या वर्षभरात उभे राहणार आहे. या सभागृहाच्या बांधकामाबाबतचा प्रस्ताव हेरिटेज विभागाकडे पाठविण्यात आला आहे, त्याची मंजुरी मिळताच लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे विद्यापीठातील विविध कार्यक्रमांसाठी एक मोठे सभागृह कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे. पदवीप्रदान आणि वर्धापनदिनासाठी विद्यापीठाच्या पाठीमागील मैदानावर मांडव घालावा लागतो. त्यासाठी विद्यापीठाचे वर्षाला लाखो रुपये खर्च होतात. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे कायमस्वरूपी सभागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठाचा मांडवासाठी दरवर्षी होणाºया खर्चामध्येही बचत होणार आहे.पदनामबदलातील वाढीव वेतन बंद होणार1 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाºयांनी राज्य शासनाची मान्यता न घेता परस्पर पदनाम बदलून वेतनश्रेणीमध्ये मोठी वाढ करून घेतली होती. ही वेतनवाढ थांबवून त्यांना पुन्हा मूळ पदांवर पाठविण्याचे, तसेच त्यांच्या वेतनाची वसुली करण्याचे आदेश राज्य शासनाने १७ डिसेंबरला एक परिपत्रक काढून दिले आहेत.2 मात्र त्या अधिकारी व कर्मचाºयांना डिसेंबर महिन्याचे वेतन अदा करताना पुन्हा वाढीव वेतन देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीमध्ये वाढीव वेतन लगेच कमी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. पदनामबदलातील अधिकारी व कर्मचाºयांचे पुढील महिन्यापासून वाढीव वेतन मिळणार नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठ