शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

अधिकारी सरकारची फसवणूक करतात : तानाजी सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 20:30 IST

पुणे जिल्ह्यातील उरळी कांचनपासून पुढील भागात पाऊस नाही. अगदी जनावांराना जमीन खुरडायला देखील गवत उगवलेले नाही...

ठळक मुद्देजनतेची कामे करण्यासाठी नियमांचाच अडथळा

पुणे : राज्यात शंभर टक्के पाऊस, अमूक ठिकाणी १३२ टक्के पाऊस अशी माहिती दिली जाते. मात्र,सोलापूर, मराठवाडा, अगदी अतिवृष्टी झालेला सांगली, साताऱ्याचा काही भाग, पुणे जिल्ह्यातील उरळी कांचनपासून पुढील भागात पाऊस नाही. अगदी जनावांराना जमीन खुरडायला देखील गवत उगवलेले नाही. अधिकारी चुकीची आकडेवारी सादर करुन सरकारची एकप्रकारे फसवणूक करीत असल्याची टीका जलसंधारण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी बुधवारी केली. मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने यशदा येथे आयोजित आदर्श गाव पुरस्कारांचे वितरण सावंत यांच्या हस्ते झाले. कृषी व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, आदर्श गाव संकल्प व प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, कृषी उपसंचालक महादेव निंबाळकर, मृद संधारण विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते, सहसंचालक दादाराम सप्रे  उपस्थित होते. 

यवतमाळमधील कोठोडा गाव ठरले आदर्शयवतमाळ जिल्ह्यामधील पांढरकवडा तालुक्यातील कोठोडा गावाने पाच लाख रुपयांचे आदर्श गावाचे पारितोषिक पटकावले. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भागडी गावांना तीन लाख रुपयांचे द्वीतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील गोधनी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील विरसई गावाला २ लाख रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार विभागून दिला.  

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारweatherहवामान