शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई अनुदानासाठी लाच घेताना कार्यालय अधीक्षक, लिपिकाला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:30 IST

तक्रारदार यांची शिक्षण संस्था असून त्यांच्या शिक्षण संस्थेत आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत शिकणाऱ्या मुलांचे अनुदान शासनाकडून मिळते़.

ठळक मुद्दे शिक्षण संस्थेच्या संचालकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

पुणे : आरटीई अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची शासनाकडून मिळणारे अनुदान बिल मंजूर करुन रक्कम अदा करण्यासाठी दीड लाख रुपयांपैकी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेचे कार्यालय अधीक्षक व लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचून पकडले़. ही कारवाई सांगवी येथील नॅशनल इंग्लिश स्कुल कार्यालयात सकाळी करण्यात आली़. कार्यालय अधीक्षक शिल्पा सुरेश मेनन (वय ४५, रा.फ्लॅट न २०३, रेणुका हेरिटेज, पर्वती) आणि लिपिक महादेव मच्छिंद्र सारुख (वय ४७, रा़ यशवंतराव चव्हाण नगर ,डहाणूकर कॉलनी, कोथरुड) अशी त्यांची नावे आहेत़ .  तक्रारदार यांची शिक्षण संस्था असून त्यांच्या शिक्षण संस्थेत आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत शिकणाऱ्या मुलांचे अनुदान शासनाकडून मिळते़. शासनाचे हे अनुदान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत मंजूर केले जाते़. त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनुदानाचे बिल मंजूर करण्याचे काम शिल्पा मेमन यांच्याकडे होते़. हे बिल मंजूर करुन ती रक्कम देण्यासाठी मेमन यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली़. शिक्षण संस्थेच्या संचालकांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती़ या तक्रारीची पडताळणी २५ मार्च रोजी करण्यात आली़. त्यात त्यांनी दीड लाख रुपयांपैकी पहिला हप्ता ५० हजार रुपये घेण्याचे मान्य केले़. महावीर जयंती निमित्त सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने त्यांनी पैसे घेण्यासाठी गुरुवारी येणार असल्याचे सांगितले़. त्यानुसार  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके, उत्तरा जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगवीतील नॅशनल इंग्लिश स्कुल येथे सापळा रचला़. नॅशनल इंग्लिश स्कुलच्या कार्यालयात सकाळी येऊन शिल्पा मेमन व लिपिक महादेव सारुख यांनी ५० हजार रुपये स्वीकारताच त्यांना पकडण्यात आले़. 

................

सुट्टीच्या दिवशी करत होत्या लाचेची मागणीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणाºया कारवायांमुळे कार्यालय अधीक्षक शिल्पा मेमन या पैशांची मागणी करताना दक्षता घेत होत्या़ कार्यालयीन कामाच्या दिवशी त्या अशा कोणत्याही बाबींबाबत बोलत नसत़ सुट्टीच्या दिवशी आपल्यावर कारवाई होणार नाही, असे त्यांना वाटत होते़ त्यामुळे त्यांनी केलेल्या लाचेची मागणीची पडताळणीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ मार्च रोजी रविवारी केली होती़ त्यात त्यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यावर पुढील कारवाई सुरु करण्यात आली होती़ गुरुवारी महावीर जयंतीची सुट्टी असल्याने त्यांनी कोणाला आपल्या कार्यालयात न बोलवता थेट संस्थेच्या कार्यालयात येणार असल्याचा निरोप दिला़ त्यानुसार त्या सकाळी सव्वानऊ वाजताच कार्यालयात पोहचल्या होत्या़ पण, दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकही तयारीत असल्याने सुट्टी असतानाही त्यांनी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले़  

 

 

टॅग्स :PuneपुणेAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागState Governmentराज्य सरकारeducationशैक्षणिक