पदाधिकारी, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
By Admin | Updated: August 4, 2014 04:36 IST2014-08-04T04:36:43+5:302014-08-04T04:36:43+5:30
या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घातल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षकावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पदाधिकारी, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
पिंपरी : चिंचवड येथील एका शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांच्या फीमध्ये अपहार केल्याप्रकरणी संस्थेचे पदाधिकारी, लिपिक यांच्यावर, तसेच या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घातल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षकावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रुती विलास देशपांडे (वय ४७, रा. समर्थ अपार्टमेंट, श्रीधरनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. अनिल श्रीपाद थत्ते (वय ४६, रा. तालेरा रोड, चिंचवड), सुबोध शंकर लेले (वय ५६, रा. तानाजीनगर, चिंचवड), राजेंद्र विलास बेलसरे (वय ३८, रा. केशवनगर, चिंंचवड), वर्षा दुराफे (वय ३४, रा. काकडे पार्क, चिंचवड) व पोलीस निरीक्षक सुनील यादव यांच्यावर गुन्हा केला आहे.
श्रीधरनगर येथील मोरया शिक्षण संस्थेतील पदाधिकारी आणि लिपिक यांनी संगनमताने २००६ पासून विद्यार्थ्यांच्या फीमध्ये अपहार केला. देशपांडे यांनी पिंपरी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)