शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी सुरक्षेसाठी मेट्रोच्या कामाची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 18:38 IST

मेट्रो च्या सर्वच प्रकल्पांमध्ये प्रवासी सुरक्षेसाठीच्या तरतुदी अत्यंत कडक करण्यात आल्या आहेत....

ठळक मुद्देमेट्रोच्या बांधणीपासून ते गाडीचा वेग किती असावा या प्रत्येक गोष्टीची अत्यंत बारकाईने पाहणी

पुणे: मेट्रोच्या सुरक्षा विभागाचे दिल्लीस्थित आयुक्त जनक कुमार गर्ग यांनी  पुणेमेट्रोच्या कामाला भेट देऊन प्रवासी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणी केली. सुरक्षा विभागाच्या वतीने मेट्रोच्या कामाची अशी प्रथमच पाहणी करण्यात आली.  मेट्रो च्या सर्वच प्रकल्पांमध्ये प्रवासी सुरक्षेसाठीच्या तरतुदी अत्यंत कडक करण्यात आल्या आहेत. त्यासाठी स्वतंत्र आयुक्त कार्यालय आहे. ज्याठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे तिथे या विभागाकडून काम सुरू असतानाच भेट दिली जाते व कामाची पाहणी केली जाते. त्याशिवाय काम पुर्ण झाल्यावर मेट्रो सुरू करताना व विशेष म्हणजे मेट्रो सुरू झाल्यानंतरही या विभागाची पाहणी होत असते व त्यांच्याकडून वेळोवेळी सुचना केल्या जातात व प्रमाणपत्रही दिले जाते.  गर्ग यांनी गुरूवारी त्यांच्या काही अधिकाऱ्यांसमवेत मेट्रो मार्गाची तसेच वनाज व रेंजहील येथील डेपोंची, पिंपरी-चिंचवड येथे सुरू असलेल्या कामाची, कृषी महाविद्यालयाजवळ सुरू असलेल्या भूयारी मार्गाच्या कामाची पाहणी केली. अधिकाऱ्यांना त्यांनी काही सुचनाही केल्या, मात्र त्याचा तपशील समजू शकला नाही. मेट्रोच्या पुणे विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. गर्ग यांनी कामाबद्धल समाधान व्यक्त केले. मेट्रो मार्ग, विद्यूत शक्तीसाठीच्या तारा, स्थानकांचे सध्या सुरू असलेले काम, वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी-चिंचवड ते बोपोडी या प्राधान्य मार्गाचे काम याबाबत गर्ग यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.   मेट्रोच्या एकूणच कार्यपद्धतीत प्रवासी सुरक्षेला अत्यंत महत्व दिले गेले अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ते म्हणाले, मेट्रोच्या बांधणीपासून ते गाडीचा वेग किती असावा या प्रत्येक गोष्टीची अत्यंत बारकाईने पाहणी केली जाते. वेगाबाबतही सुरक्षा विभाग प्रत्यक्ष पाहणी करून लेखी प्रमाणपत्र देत असतो. त्यानुसारच वेग ठेवावा लागतो. प्रवासी वाहतूक सुरू करण्याआधी दररोज एक गाडी संपुर्ण मार्गावर विनाप्रवासी फिरवली जाते. ती जाऊन परत आल्यानंतरच तशी नोंद करून नंतरच प्रवासी वाहतूक सुरू केली जाते. 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो