शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी फेसबुकवर अश्लिल मजकूर

By विवेक भुसे | Updated: October 2, 2022 16:10 IST

सायबर पोलिसांनी केला बदनामीचा गुन्हा दाखल

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बदनामीकारक व अश्लिल मजकूर फेसबुकवरील हिंदू एकता ग्रुप वर पोस्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी बदनामीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माहिती-तंत्रज्ञान सेलचे विनित भरतकुमार बाजपेयी (वय ३९, रा. धानोरी) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हिंदू एकता ग्रुपवर पोस्ट करणारे रामदास शिर्के याच्यावर बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर हिंदू एकता नावाने ग्रुप आहे. त्यात नाट्यरुपाने काही संवाद देण्यात आले आहेत. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संवाद देण्यात आले आहेत. नाट्यरुपांतर केलेल्या या संवादामध्ये आक्षेपार्ह आणि अश्लिल मजकूर देण्यात आला आहे. मान्यवरांच्या घटनात्मक व राजकीय प्रतिष्ठितांचे लौकिकास बाधा येईल, असा मजकूर आहेत. त्यामुळे बदनामी करणारा मजकूर प्रसारित केल्याने गुन्हा दखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे पाटील यांनी सांगितले की, फेसबुकवरील हिंदू एकता ग्रुपवर ही पोस्ट टाकण्यात आली आहे. त्याची माहिती फेसबुककडून मागविण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेAmit Shahअमित शाहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेFacebookफेसबुकcyber crimeसायबर क्राइम