पुणे - मित्राच्या बहिणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून तिच्यासोबतच अश्लील भाषेत चॅटिंग करणाऱ्या एका तरुणाचा खून करण्यात आला. आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जांभूळवाडी तलाव परिसरात ही घटना घडली. फोन करून पळून गेलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन मुसक्या आवळल्या. रोहित धुमाळ (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुरज गणेश सूर्यवंशी (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दीपक सुरेश बंडगर (वय २१) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रोहित आणि आरोपी सुरज एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने सुरज सूर्यवंशीच्या मित्राच्या बहिणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केले होते. आणि या अकाउंट वरून तो तिच्याशी अश्लील भाषेत चॅटिंग करत होता. मित्राच्या बहिणीने हा संपूर्ण प्रकार सुरज सूर्यवंशी याला सांगितला. त्यानंतर सुरज सूर्यवंशी याने त्याबरोबर अकाउंट वर इंस्टाग्राम कॉल केला असता तो रोहितने उचलला. त्यानंतर हे बनावट अकाउंट वरून किती असल्याचे उघड झाले. यावरून दोघात भांडण झाले.
दरम्यान, १५ जून रोजी मयत रोहित, आरोपी सुरज आणि फिर्यादी दीपक तिघे कात्रज परिसरातील जांभुळवाडी तलावावर एकत्र जमले होते. यावेळी रोहित आणि दीपक यांच्या मित्राच्या बहिणी वरून भांडण झाले. रागाच्या भरात दीपकने दगडाने वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या रोहितचा मृत्यू झाला. त्यानंतर दीपक बंडगर हा फरार झाला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास करून मध्य प्रदेशातील इंदोर येथे नातेवाईकाच्या घरात लपलेल्या दीपकला बेड्या ठोकल्या.
कारवाई पोलीस उपयुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका मोरे, मोहन कळमकर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.