शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

OBC Reservation : एकमेकांकडे बोटं दाखवून मार्ग निघणार नाही; सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊ : विजय वड्डेटीवारांचा विरोधकांना सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 15:31 IST

सर्वच राजकीय नेत्यांनी पक्षाच्या पलिकडे जाऊन मराठा किंवा ओबीसी आरक्षणाचा विषय चर्चेला आणणे आवश्यक आहे.

पुणे : राज्यात ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवरून भाजप आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करत देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे प्रमुख नेतेमंडळी रस्त्यावर उतरली आहे. याचवेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांना एकमेकांकडे बोटं दाखवून मार्ग निघणार नाही; आता सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊ असे आवाहन केले आहे.  

लोणावळ्यात ओबीसी चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आह. या बैठकीला मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ उपस्थित  होते. यावेळी ते बोलत होते. वड्डेटीवार म्हणाले, या परिस्थितीत एकमेकांकडे बोटं दाखवून मार्ग निघणार नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. तरच आरक्षणाचा किंवा किंवा इतर मार्गी लागणे शक्य आहे. तसेच सर्वच राजकीय पक्ष आंदोलन हे ताकद वाढण्यासाठी करतात. पण कुठल्याही सामाजिक संघटनांचे आंदोलन हे समाजासाठी असतात. त्यामध्ये विश्वासार्हता असते. सर्वच राजकीय नेत्यांनी पक्षाच्या पलिकडे जाऊन हा विषय चर्चेला आणणे आवश्यक आहे.

आम्ही कितीही आंदोलने केली. पण त्यातून वडेट्टीवार काँग्रेसची भूमिका मांडतात हाच अर्थ काढला जाईल. तसेच भाजपाने आंदोलने केली तर ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात आहे, हेच समजले जाणार आहे असेेेही मत वडेट्टीवार  यांनी व्यक्त केलं.

.... पण निवडणूक आली का तुझी जात कंची? छगन भुजबळ पाच वर्षे छगन भुजबळ चांगला असतो, कामं करतो. पण निवडणूक आली का तुझी जात कंची? असा प्रश्न विचारला जातो असे सांगत भुजबळ म्हणाले,ओबीसींमध्ये कुठल्या जातीचा उमेदवार उभा राहिला तर इतर जाती समर्थन करत नाही ही परिस्थिती आहे. तसेच मी कुणावर आरोप करत नाही, ना पंकजा मुंडे ना देवेंद्र फडणवीस. पण ते कशाप्रकारे दिशाभूल करत आहेत ते सांगणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचं नेतृत्त्व करावं आणि पंतप्रधानांकडे जाऊन इम्पेरीकल डेटा मागावा असेही छगन भुजबळ म्हणाले.

टॅग्स :lonavalaलोणावळाOBC Reservationओबीसी आरक्षणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारBJPभाजपाChhagan Bhujbalछगन भुजबळPoliticsराजकारण