शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

चिंताजनक !पुण्यात दहा दिवसातच वाढले पाच हजार रुग्ण, दुपटीचा कालावधी होतोय कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 12:51 IST

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे...

ठळक मुद्देशहरातील बाजारपेठा , दुकाने, सरकारी, खासगी कार्यालये सुरू

पुणे : लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केल्यानंतर शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत केवळ दहाच दिवसांत पाच हजार रुग्णांची भर पडली आहे. कोरोना चाचण्यांमधील बाधितांचे प्रमाणही मागील आठवड्याच्या तुलनेत सुमारे दीड टक्क्यांनी वाढले आहे. तसेच रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी होताना दिसत असल्याने चिंतेत भर पडली आहे.शहरातील बहुतेक बाजारपेठा, खासगी-शासकीय कार्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे रस्ते, दुकानांसह कार्यालयांमधील गर्दीही वाढू लागली आहे. परिणामी, कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. मागील आठवडाभर दररोत ३ हजारांहून अधिक नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. त्यामध्ये पॉझिटिव्ह आढळणाºया रुग्णांचे प्रमाण जवळपास १८ टक्के आहे. त्यामुळे चाचण्या वाढण्याबरोबरच त्यातुलनेत रुग्णांचे प्रमाणही वाढत चालले आहे. मागील दहा दिवसांतच दररोज ५०० च्या सरासरीने तब्बल ५ हजार रुग्ण वाढले आहेत. शनिवारी (दि. २७) तर एकाच दिवशी ८२२ रुग्ण आढळून आले. शहरात रुग्णसंख्येचा पहिला पाच हजारांचा टप्पा गाठण्यासाठी ७७ दिवस लागले होते. त्यानंतरचा पाच हजाराचा टप्पा २२ दिवसांत तर आता केवळ १० दिवसांत ओलांडला आहे. ---------चाचण्यांच्या तुलनेत रुग्णही वाढलेशहरात दि. १७ ते २६ जून या कालावधीत एकुण २७ हजार ८४९ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी ४९५९ म्हणजे १७.८० टक्के नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. तर दि. ७ ते १६ जून या कालावधीत एकुण १७ हजार ७५१ चाचण्यांपैकी २ हजार ९२१ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. हे प्रमाण १६.४५ टक्के एवढे आहे. याचा अर्थ चाचण्यांमधील कोरोना बाधितांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. 

कालावधी चाचण्या रुग्ण टक्केवारीदि. १७ ते २७ जून २७,८४९ ४,९५९ १७.८०दि. ७ ते १७ जून १७,७५१ २,९२१ १६.४५------------------दुपटीचा कालावधी झाला कमीशहरात दि. ६ जून रोजी एकुण ७ हजार ७२२ रुग्णसंख्या होती. हा आकडा जवळपास दुप्पट होण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागला. त्यानुसार दि. २७ जून रोजी हा आकडा १५,६०२ वर पोहोचला. तर मागील आठवड्यातील दि. २० जून रोजीची ११,८५४ रुग्णसंख्या होण्यासाठी २३ दिवस लागले. दि. २८ मे रोजी ५ हजार ८५१ एवढी रुग्णसंख्या होती. यावरून मागील आठवड्याच्या तुलनेत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दोन दिवसांनी कमी झाल्याचे दिसते. दिवस रुग्णसंख्यादि. २७ जून १५,६०२दि. ६ जून ७,७२२दि. २० जून ११,८५४दि. २८ मे ५,८५१-----------------रुग्णवाढीचे टप्पे

दिवस              रुग्ण                  कालावधीदि. ९ मार्च         २दि. २५ मे       ५१८१                   ७७ दिवसदि. १६ जून    १०,१८३                २२ दिवसदि. २७ जून   १५,६०२              १० दिवस----------------------------------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरNavalkishor Ramनवलकिशोर रामPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका