ओतूर परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:07 IST2021-02-05T05:07:06+5:302021-02-05T05:07:06+5:30
या कालखंडात दि.२३ धोलवड १ दि.२४ रोजी ओतूर शहरात २, दि.२५ जानेवारी पासून ते ३० जानेवारी अखेर ...

ओतूर परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या घटली
या कालखंडात दि.२३ धोलवड १ दि.२४ रोजी ओतूर शहरात २, दि.२५ जानेवारी पासून ते ३० जानेवारी अखेर एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. ओतूर परिसर कोरोना मुक्ती कडे वाटचाल करताना दिसून येत आहे.
आतापर्यंत ओतूर परिसरात एकूण ८९० बाधित रुग्ण सापडले, त्यापैकी ८३६ बरे झाले आहेत .फक्त ८ ,जण उपचार घेत आहेत.४६ जणांचा मृत्यू झाला आहे .
कोरोना चे रुग्ण नाही म्हणून नियंमांचे उल्लंघन करु नये, सँनिटायझर वापर मास्क व सोशल डिस्टंट चे पालन करून गर्दी करू नका, यांचे पालन करणे आवश्यक आहे .तरच आपण कोरोना ला हद्दपार करु शकतो असे डॉ सारोक्ते यांनी सांगितले .