शहरात सक्रिय रुग्णसंख्या आली दोन हजारच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:18 IST2021-02-05T05:18:01+5:302021-02-05T05:18:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात बुधवारी १२८ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. १६८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ...

शहरात सक्रिय रुग्णसंख्या आली दोन हजारच्या आत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात बुधवारी १२८ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. १६८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ७१ संशयितांची तपासणी केली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ४.१४ टक्के इतकी आहे़ दरम्यान, गेल्या दहा महिन्यांत १९ हजारापर्यंत पोहचलेली सक्रिय रुग्ण संख्या आजमितीला दोन हजाराच्या आत आली आहे. सध्या शहरात कोरोनाचे १ हजार ९४७ इतकेच सक्रिय रुग्ण आहेत़
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये २०२ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९६ इतकी आहे़ आज दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७४४ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत १० लाख ११ हजार ७०७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८५ हजार १३३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७८ हजार ४४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़