शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

एनपीआर हे एनआरसीचेच पहिले पाऊल : सचिन पायलट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 13:19 IST

राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काॅंग्रेसचे नेते सचिन पायलय यांनी एनआरसीवरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

पुणे : सरकारकडून नॅशनल पब्लिक रेकाॅर्ट (एनपीआर) लागू केले जात आहे. परंतु एनपीआर हे राष्ट्रीय नागरिकता संशाेधन(एनआरसी) चे पहिले पाऊल असल्याची टीका राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केंद्र सरकारवर केली. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार उपस्थित हाेते. आम्ही आणलेले एनपीआर आणि आत्ताचे सरकार आणत असलेल्या एनपीआरमध्ये जमीन आसमानचा फरक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पायलट यांनी पत्रकार परिषदेमध्ये केंद्र सरकारवर जाेरदार टीका केली. महागाई, बेराेजगारी, ढासळती अर्थव्यवस्था यावरुन देशाचे लक्ष हटविण्यासाठी सीएए, एनआरसी सारखे कायदे आणले जात असल्याचे ते म्हणाले. तसेच धर्माच्या आधारावर नागरिकता देणे चुकीचे असून ते संविधानाच्या कलम 14 च्या विराेधात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

केंद्र सरकारवर टीका करताना पायलट म्हणाले, केंद्र सरकारने देशभरात गाेंधळ निर्माण केला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) हे कुठल्या हेतूने लागू करण्यात आले हे तपासणे आवश्यक आहे. आसममध्ये पुन्हा एनआरसी लागू करण्याचा विचार केला जात आहे. आसाममध्ये आधी करण्यात आलेल्या एनआरसीमध्ये बाहेर पडलेले 14 ते 15 लाख नागरिक हे हिंदू आहेत. जे गरीब, आदिवासी, दलित, मागासवर्गीय लाेक आहेत. ते यात भरडले जात आहेत. एकीकडे देशात शेतकरी आत्महत्या करत असताना, आर्थिक मंदीला देश सामाेरा जात असताना या विषयांवरुन देशाचे लक्ष हटविण्यासाठी हे कायदे सरकारकडून आणले जात आहेत. 

देशाची नागरिकता धर्माच्या आधारावर देणे चुकीचे आहे. ज्याला नागरिकत्व हवे आहे त्याला देण्यास हरकत नाही. परंतु त्या व्यक्तीमुळे जर देशाला धाेका निर्माण हाेणार असेल तर त्या व्यक्तीला कधीच नागरिकत्व देऊ नये. परंतु विशिष्ट धर्माच्या आधारावर नागरिकत्व नाकारणे चुकीचे आहे. हे संविधानाच्या कलम 14 च्या विराेधात आहे. या नवीन कायद्यांचा भाजपसाेबत असणारे पक्ष सुद्धा विराेध करत आहेत. सरकारने या कायद्यांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. 

काेणी राजकारणासाठी देशाला ताेडायचा प्रयत्न केला तरी हा देश एकसंध राहील. या देशाचा प्रत्येक नागरिक या भारतमातेचा सुपूत्र आहे. जे देश धर्माच्या आधारावर निर्माण झाले आहेत, त्यांची अवस्था आपल्या सगळ्यांसमाेर आहे. हा देश नेहमीच एकजूट राहील असेही पायलय यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी