आता वेध नाटय़संमेलन स्थळाचे
By Admin | Updated: July 9, 2014 23:57 IST2014-07-09T23:57:48+5:302014-07-09T23:57:48+5:30
साधक-बाधक चर्चा रंगत असताना सहसा त्याच दरम्यान होणारे नाटय़ संमेलन कोठे होणार, याकडे आता नाटय़प्रेमींचे लक्ष लागले आहे.

आता वेध नाटय़संमेलन स्थळाचे
पुणो : साहित्य संमेलनाच्या लगबगीला वेग आला असून, अनेक साधक-बाधक चर्चा रंगत असताना सहसा त्याच दरम्यान होणारे नाटय़ संमेलन कोठे होणार, याकडे आता नाटय़प्रेमींचे लक्ष लागले आहे. 95 वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन ‘ बेळगाव’ला व्हावे, अशी इच्छा गतवर्षीच्या नाट्य़संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकारणी मंडळींनी व्यक्त केली होती. त्याची दखल घेतली जाणार की त्याला बगल देत अन्य स्थळांचा विचार केला जाणार, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे. आगामी नाटय़संमेलनासाठी 5 ठिकाणांहून निमंत्रणो आली असून, ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी सांगितले.
यंदाच्या नाटय़संमेलनासाठी नागपूर, नाशिक, बेळगाव, ठाणो आणि कोल्हापूर याठिकाणाहून मध्यवर्ती शाखेकडे निमंत्रणो आली आहेत. दर वर्षी होणा:या नाटय़ संमेलनाच्या समारोपातच आगामी नाटय़ संमेलनासाठी आलेली निमंत्रणो जाहीर केली जातात. त्याप्रमाणो पंढरपूर येथे झालेल्या 94 व्या नाटय़ संमेलनात आगामी संमेलनासाठीची इच्छुक स्थळे घोषित करण्यात आली होती. मात्र, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी ‘बेळगाव’ला नाटय़ संमेलन व्हावे, अशी इच्छा संमेलनाच्या समारोपात जाहीरपणो प्रकट केली होती. ज्याला नाटय़रसिकांनी तत्काळ संमतीही दिली. मात्र, हा निर्णय नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या अखत्यारीतील असल्याने त्याची नंतर फारशी चर्चा झाली नाही.
संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिका अनेक रंगकर्मीना वेळेवर मिळू शकल्या नाहीत. स्मरणिकेच्या अल्प प्रती छापून प्रकाशनाची वेळ मारून नेण्यात आली. या गोष्टी टाळण्यासाठी नाटय़ संमेलनाचे स्थळ साहित्य संमेलनाप्रमाणो लवकर जाहीर करण्यात यावे, जेणोकरून आयोजक संस्थेला नियोजनासाठी पुरेसा अवधी मिळू शकेल, अशी अपेक्षा नाटय़रसिकांकडून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
नाटय़प्रेमींत उत्सुकता
4आगामी नाटय़ संमेलन कुठे होणार? याची उत्सुकता आता नाटय़प्रेमींना लागली आहे. नाटय़संमेलन प्रक्रियेच्या हालचालीस मध्यवर्ती शाखेकडून ऑक्टोबरनंतर ख:या अर्थाने सुरूवात होते. यामुळे स्थळ निवडीला ऑक्टोबरनंतरचा मुहूर्त लागतो.
4चार महिन्यांत आयोजक संस्थेला संमेलनाचे संपूर्ण नियोजन करावे लागते, याच कारणामुळे गतवर्षीच्या संमेलनात मोठय़ा प्रमाणावर नियोजनाचा अभाव जाणवला.