शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आता नायब तहसीलदारही करणार मिळकतीत हिस्स्याच्या निकालाची अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:42 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण

पुणे : वडिलोपार्जित मिळकतीत हिस्सा मिळवण्यासाठी दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी तहसीलदारांसह आता नायब तहसीलदारही करू शकणार आहेत. जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा निर्णय घेतला असून, जिल्ह्यात अशी सुमारे चौदाशे प्रकरणे आहेत. निर्णय लवकर झाल्यास अर्जदारांना आपल्या हक्काची मिळकत तातडीने मिळण्यास मदत होणार आहे.एखाद्या वडिलोपार्जित मिळकतीत वारसांना डावलण्यात आले असल्यास संबंधित नागरिक दिवाणी न्यायालयात दावा दाखल करतात. दाव्याची बाजू लक्षात घेऊन न्यायालयाकडून निकाल दिला जातो. त्यात मिळकतीत हिस्सा द्यावा एवढेच नमूद केले जाते, तर मिळकतीत नेमका कोणता हिस्सा द्यावा, याचे अधिकार कायद्यानुसार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. त्यामुळे तहसीलदार भूमिअभिलेख विभागाकडून संबंधित मिळकतीची चतु:सीमा निश्चित करून हिस्स्यांची विभागणी करून घेतात. त्यानंतर तहसीलदार पक्षकारांची एकत्रित सुनावणी घेऊन हिस्सा निश्चित करून न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करतात.जिल्ह्यात डिसेंबर २०२४ अखेर एकूण एक हजार ३९३ न्यायालयाचे निकाल हिस्स्यांच्या विभागणीसाठी प्रलंबित आहेत. सध्या तहसीलदारांकडे विविध विभागांची कामे असल्याने त्यांच्याकडील वेळ लक्षात घेता तहसीलदारांना देण्यात आलेले आदेश नायब तहसीलदारांना प्रदान करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डुडी यांनी घेतला आहे. त्यामुळे ज्या तालुक्यात प्रकरणांची संख्या अधिक आहे, अशा ठिकाणचे तहसीलदार नायब तहसीलदारांच्या मदतीने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करतील.

यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने १५ मार्च ते १० जून या कालावधीमध्ये ही सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे ठरविले आहे. त्यानुसार १५ मार्च ते १५ एप्रिल या दरम्यान मिळकतींची मोजणी पूर्ण करून वाटप तक्ता तहसीलदारांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ एप्रिल ते १५ मे या काळात तालुकास्तरावर वाटप तक्ता मंजूर करण्यात येईल. १६ मे ते ३१ मेदरम्यान हिस्सेदारांना ताबा देणे व ताबा पावती तयार करणे यावर कार्यवाही करण्यात येणार आहे, तर १ जून रोजी ताबा पावतीनुसार फेरफार मंजूर करून दुरुस्त केलेले सातबारा उतारे तयार करून त्याचे वाटप संबंधितांना करण्यात येईल. १ जून ते १० जून या काळात न्यायालयाच्या निकालानुसार अंमलबजावणी झाल्याचे न्यायालयाला कळविण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (कुळकायदा शाखा) नामदेव टिळेकर यांनी दिली.

नागरिकांच्या जिव्हाळ्याची ही प्रकरणे असतात. कामाच्या भारामुळे तहसीलदार त्यावर तातडीने अंमलबजावणी करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करून नायब तहसीलदारांना देण्यात आले आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांवर तातडीने निर्णय होऊन पक्षकारांना दिलासा मिळेल.  - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी तहसीलदारांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण केल्यामुळे प्रलंबित प्रकरणे लवकर मार्गी लागून संबंधित हिस्सेदारांना आपल्या हक्काचा वाटा तातडीने मिळू शकणार आहे. - सुहास मापारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcollectorजिल्हाधिकारी