शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

महापालिकेकडून थुंकणाऱ्यांनंतर आता कचरा करणारे लक्ष्य : प्रत्येक वेळेस १८० रूपये दंड 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 8:53 PM

रस्त्यावर कुठेही थूंकून घाण करणाऱ्यांना महापालिकेने दंड करण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देलवकरच सुरू होणार मोहीम सार्वजनिक स्वच्छता बाळगणाऱ्या नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागतशहरात दररोज नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांचा मिळून तब्बल २ हजार २०० टन कचरा कचरा फेकण्याचे प्रमाण सकाळी व रात्री जास्तउत्पन्न वाढवणे महापालिकेला अपेक्षित नसून शहर स्वच्छ रहावे हा प्रमुख उद्देश

पुणे: रस्त्यावर कुठेही थूंकून घाण करणाऱ्यांना दंड करण्यास सुरूवात केल्यानंतर महापालिका आता रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना लक्ष्य करणार आहे. अशा नागरिकांना १८० रूपये दंड करण्यात येणार आहे. लवकरच ही मोहीम सुरू होणार असून त्याची तयारी घनकचरा व्यवस्थापन विभागात सुरू आहे. रस्त्यावर कुठेही थूंकून घाण करणाऱ्यांना महापालिकेने दंड करण्यास सुरूवात केली आहे. २ नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही मोहीम दिवाळीत थोडी थांबवण्यात आली होती. आता ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक स्वच्छता बाळगणाऱ्या नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळेच आता रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात येणार आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.  मोळक म्हणाले, कचºयाबाबत थेट सर्वोच्च न्यायालयापासून ते राष्ट्रीय हरित प्राधिकरणापर्यंत महापालिकेवर वारंवार ताशेरे मारण्यात येत असतात. त्यामुळे हा विभाग जागरूक झाला आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांचा मिळून तब्बल २ हजार २०० टन कचरा शहरात दररोज निर्माण होतो. त्यातील १ हजार २०० टन कचºयावर प्रक्रिया केली जाते. ३०० टन कचºयाचे रिसायकलींग केले जाते व ५०० टन कचरा ओपन ग्राऊंडवर डंप केला जातो. स्वच्छ या स्वयंसेवी संस्थेच्या कर्मचाºयांकडून घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यात येत असतो. ते पालिकेचे पगारी नोकर नाहीत व त्यांच्या संस्थेला प्रशासकीय खर्चापेक्षा जास्त पैसे दिले जात नाहीत. त्यांना प्रत्येक कुटुंबाने महिना ६० रूपये द्यावेत व ओला तसेच सुका कचरा वेगळा करून द्यावा असे अपेक्षित आहे. तसे होत नाही. त्यांना ६० रूपये दिले जात नाही. कचरा रस्त्यावर फेकला जात असतो. यावर उपाय म्हणून आता कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे असे स्पष्ट करून मोळक म्हणाले, रस्त्यावर कचरा फेकणे हा आपला हक्क असल्यासारखे अनेक नागरिक वागत असतात. कचरा वेगळा करून देत नाहीत. सार्वजनिक ठिकाणच्या कोपºयात कचरा फेकत असतात. त्या सर्वांना शिस्त लागावी यासाठी आता थुंकणाऱ्यांना दंड करण्यात येतो तसाच कचरा फेकणाºयांनाही करण्यात येणार आहे. प्रत्येक वेळेस १८० रूपये दंड आकारला जाईल. त्याशिवाय फेकलेला कचरा जमा करून तो कचरा वाहणारी जी यंत्रणा महापालिकेने तयार केली आहे, त्यांच्याकडे द्यायची जबाबदारीही संबधितावरच असेल. अशा यंत्रणेची माहिती त्यांनी करून घेणे अपेक्षित आहे. नसेल तर महापालिका ती त्वरीत करून देण्यास तयार आहे. मात्र यंत्रणा असूनही त्याचा वापरच न करणे हा गुन्हाच आहे व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या आरोग्य उपविधीत तशी तरतुदही आहे.थुंकणाºयांना दंड करण्यासाठी महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात १५ जणांचे एक पथक तयार केले आहे. त्यांचे नेमुन दिलेले काम संपल्यावर दुपारी १२ ते २ या वेळात त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख चौकांमध्ये थांबून सिग्नल वगैरे ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंड करावा असे त्यांना सांगण्यात आले आहे. १५० रूपये दंड करण्यात येतो. लगेच पावतीही दिली जाते. थूंकलेली जागा त्याच्याकडूनच स्वच्छ करून घेण्यात येते. त्यासाठी बादली, फडके महापालिका देते. कचरा फेकण्याचे प्रमाण सकाळी व रात्री जास्त असते. त्यामुळे त्यासाठी तशा पथकांची रचना तयार करण्यात येणार आहे अशी माहिती मोळक यांनी दिली. यात पैसे जमा करून उत्पन्न वाढवणे महापालिकेला अपेक्षित नसून शहर स्वच्छ रहावे हा प्रमुख उद्देश आहे असे ते म्हणाले. ..............दंड आकारताना संबधितांबरोबर नम्रतेने वागावे, अरेरावी करू नये अशा स्पष्ट सुचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहे. त्यांना धडा मिळावा, शरम वाटावी एवढेच यात आहे. आतापर्यंत ४७६ जणांना दंड करून ७ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला, मात्र कुठेही, कोणाशीही भांडणे, वादावादी झालेली नाही. उलट संबधितांनीच आता पुन्हा कधीही असे कुठेही थुंकणार नाही असे सांगितले आहे.ज्ञानेश्वर मोळक, सहआयुक्त, घनकचरा विभाग

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका